HW News Marathi
मुंबई

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार रुग्णालयात दाखल

मुंबई | ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती न्युमोनियाने खालावली असून त्यांना काल (रविवारी) रात्री पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिलीप कुमार यांच्या ट्विटर अकाऊंटवरूनच ही माहिती त्यांच्या चाहत्यांना देण्यात आली आहे. अभिनेते दिलीप कुमार सध्या ९५ वर्षांचे आहेत. गेल्या महिन्यात ५ सप्टेंबर रोजी त्यांना मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना तब्बल १४ दिवसांनी डिस्चार्ज देण्यात आला होता.

https://twitter.com/TheDilipKumar/status/1049200484949643266

रविवारी रात्री न्युमोनियामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे निकटवर्तीय फैसल फारूखी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. “रविवारी रात्री दिलीप कुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना न्युमोनिया झाला असून सध्या लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करा. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यावर ट्विटरद्वारे कळवण्यात येईल,” असे त्यांनी ट्विटमध्ये केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आता राज ठाकरे चक्क उत्तर भारतीयांच्या मंचावर

swarit

राहुल गांधी उद्या मुंबई दौऱ्यावर

News Desk

सांताक्रूझ येथे गुजराल हाऊसला आग

News Desk
मुंबई

परप्रांतीयांनी काम न केल्याने मुंबई बंद पडणार नाही | आठवले

News Desk

मुंबई । मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलेल्या वक्तव्यावर आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मनसेने “निरुपम म्हणजे भटका कुत्रा”असा मजकूर लिहून सोशल मीडियावर पोस्टर्स व्हायरल करून संजय निरुपम यांच्यावर टीका केली आहे. “उत्तर भारतीयांनी मुंबईत काम केले नाही तर मुंबई बंद पडणार हे मान्य नाही,” असे भारतीय रिपब्लिकन पक्ष या पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटले आहे. “निरुपम यांनी मराठी भाषिक आणि उत्तर भारतीयांमध्ये वाद निर्माण करून देऊ नये. असा वाद निर्माण केल्यास काँग्रेसला काही फायदा होणार नाही. त्या उलट मराठी भाषिक त्यांचा विरोधच करतील,” असेही रामदास आठवले म्हणाले आहेत. “उत्तर भारतीयांचे मुंबईला मोठे योगदान आहे, यात दुमत नाही. परंतु त्यांनी काम न केल्याने मुंबई बंद पडणार हे मला मान्य नाही,” असे रामदास आठवले म्हणाले आहेत.

काय होते संजय निरुपम यांचे वादग्रस्त वक्तव्य

“उत्तर भारतीय कोणत्याच कामात मागे नाहीत. सगळ्या क्षेत्रात ते सक्रिय आहेत. उत्तर भारतीय लोक टॅक्सी-रिक्षा चालवण्यापासून दूध विकण्यापर्यंतची सगळी काम ते करतात. फळ, भाजी, वर्तमानपत्र विकणे अशी सर्वच कामे उत्तर भारतीयच समाज करतो. मुंबईकरांचा भार उत्तर भारतीय त्यांच्या खांद्यावर घेऊन चालत असतो. बांधकाम क्षेत्रातसुद्धा मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीयच असतात. जर कधी उत्तर भारतीयांनी ठरवले की काम करायचे नाही. तर मुंबई आणि महाराष्ट्र ठप्प पडेल. मुंबईकरांना जेवायला सुद्धा मिळणार नाही”.

Related posts

राहुल गांधी उद्या मुंबई दौऱ्यावर

News Desk

“सी वॉर्ड” मध्ये स्वच्छता अभियानाची रॅली

Gauri Tilekar

पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांवर  टिका करणा-या दोघांवर गुन्हा दाखल

News Desk