HW News Marathi
मुंबई

“सी वॉर्ड” मध्ये स्वच्छता अभियानाची रॅली

मुंबई | आज सकाळी महानगरपालिका “सी वॉर्ड” मध्ये स्वच्छता अभियानाची रॅली काढण्यात आली होती. यात प्रामुख्याने महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी व भाजपच्या स्थानिक नगरसेविका रिटा मकवना यांनी ‘प्लास्टिक मुक्त पर्यावरणचा ‘ हा संदेश दिला. यावेळी महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी व स्थानिक भाजपा नगरसेविका रिटा मकवाना, सुरेश बाबू येडगे, निखिल देसाई आदी उपस्थित होते.

त्याचप्रमाणे ‘पातळ प्लास्टिकच्या पिशव्या म्हणजे निसर्गाचा शत्रू तिचा वापर टाळावा. ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा करून महानगरपालिकेच्या गाडीत टाकावा,’ असेही त्यांनी सांगितले आहे. आपला परिसर स्वच्छ ठेवा, घर-गल्ल्या, पदपथ स्वच्छ ठेवा. तसेच ओला व सुका कचरा वेगवेगळा करून सुका कचरा भंगारवाल्याला द्या व ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करा, असा संदेश “सी विभागातील” रहिवाशांना दिला आहे.

“सी वॉर्ड” हा माझा विभाग असल्याने माझ्या विभागातील स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्नशील आहे. मी सर्वांच्या घरी जाऊन आता जनगृती करणार आहे,” अशी प्रतिक्रिया भाजपा नगरसेविका रिटा मकवाना यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई पोलिसांकडून दाऊदच्या पुतण्याला अटक

News Desk

दहिकाला तीन गोविंदांच्या जीवावर!

News Desk

मुख्यमंत्र्यांनाच अटक करा संभाजी ब्रिगेडची मागणी

News Desk