HW News Marathi
मुंबई

मुंबईत जमावाकडून पोलिसांना मारहाण

मुंबई | आंबोली परिसरात नाकाबंदीदरम्यान दोन पोलीस कर्मचाऱ्यांना जमावाकडून मारहाण करण्यात आली. विनाहेल्मेट वाहन चालविणाऱ्या युवकाला अडविल्यामुळे हा प्रकार घडला. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

आंबोली परिसरात पोलिसांनी नाकाबंदी केली होती. याच वेळी एन. खरोडिया नावाचा युवक विनाहेल्मेट वाहन चालवताना पोलिसांना आढळून आला. यावर पोलिसांनी त्याला थांबवून दंड भरण्यास सांगितले. यानंतर आरोपी युवकाने पोलिसांशी वाद घातला. एवढेच नाही, तर त्याने सागर कोंडविलकर या पोलीस कर्मचाऱ्याच्या हातावर वारही केला. त्यामुळे त्यांच्या हातातून रक्तस्त्राव होऊ लागला. याचवेळी पोलीस निरीक्षक सागर यांनी या युवकाला पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्या हातावरचे रक्त आरोपी युवकाच्या शर्टवर पडले. यातून आजूबाजूला असलेल्या जमावाला आरोपी युवकाला मारहाण झाल्याचा गैरसमज झाला. यानंतर जमावातील काही नागरिकांनी पोलिसांना मारहाण करून आरोपीला सोडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी नागरिकांनी पोलिसांच्या गाडीची तोडफोडही केली.

घटनास्थळी अधिक पोलीस बल आल्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात आले. दरम्यान आरोपी एन. खरोडिया या युवकाला ताब्यात घेण्यात आले असून जखमी पोलिसांवर उपचार सुरू आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बातमीचा इम्पॅक्ट | धारावीचा शेटवाडी नाला झाला साफ

swarit

तुर्भे रेल्वे स्थानकावर तरुणी विनयंभगाचा प्रकार

swarit

नारायण राणेंनी ‘अधीश’ बंगल्यातील अनधिकृत बांधकाम स्वत: हून पाडण्यास केली सुरुवात

Aprna