HW News Marathi
मुंबई

मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट

मुंबई | भातसा धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात विसर्ग झडपांत तांत्रिक बिघाड निर्माण झाला होता. यामुळे दुरुस्तीनिमित्त १२ ते १४ जून असे तीन दिवस २५ टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार होती. मात्र दुरुस्तीचे काम तत्काळ करण्यात आल्यामुळे आता मुंबईकरांना २५ टक्के अतिरिक्त पाणीकपातीचा सामना करावा लागणार नाही. परंतु, काही भागांमध्ये या काळात १० ते १५ टक्के कमी पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याचे जल अभियंता विभागातून स्पष्ट करण्यात आले.

मुंबईला दररोज तीन हजार ८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. परंतु गेल्या पावसाळ्यात तलावांमध्ये कमी पाणी जमा झाल्यामुळे १५ नोव्हेंबर २०१८ पासून मुंबईत सरसकट १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. तलावांमधील जलसाठा कमी होत चालल्याने पाणीटंचाईची अधिकच झळ मुंबईकरांना बसत आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग

News Desk

कोपर रेल्वे स्थानकात टीसीला मारहाण करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

News Desk

मुंबईला पाणी पुरवठा करणारी चारही धरणे ओव्हरफ्लो

News Desk