मुंबई | लोकांना मेणबत्ती पेटवायला सांगणे हे काय पंतप्रधानांचे काम आहे का अशी मोदींच्या आवाहनावर महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे. ‘थाळी-टाळीनंतर आता दिवे जाळण्याचा कार्यक्रम सादर होत आहे. देशाला इव्हेंटची नव्हे तर रुग्णालयं, व्हेंटिलेटर आणि वैद्यकीय चाचणी प्रयोगशाळांची गरज आहे. हातावर पोट असलेले मजूर व कामगारांना दोन वेळचं जेवण हवं आहे. लोकांना दिवे लावायला सांगणं हे पंतप्रधानांचं काम आहे का? निदान अशा कठीण प्रसंगी तरी पंतप्रधानांनी गांभीर्य दाखवायला हवं. मोदींनी हे प्रसिद्धीचे स्टंट बंद करून काहीतरी ठोस पावले उचलावी, अशी अपेक्षा बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.
थाळी-टाळीनंतर आता दिवे लावण्याचा कार्यक्रम सादर होत आहे. देशाला इव्हेंटची नव्हे तर रुग्णालयं, व्हेंटिलेटर #COVIDー19 चाचणी लॅबची गरज आहे. हातावर पोट असलेले मजूर व कामगारांना दोन वेळचं जेवण हवं आहे. त्यामुळं @PMOIndia हे प्रसिद्धी स्टंट बंद करून काहीतरी ठोस पावलं उचला.@INCIndia pic.twitter.com/bqQjFn5RBC
— Balasaheb Thorat (@bb_thorat) April 3, 2020
तर, कॉंग्रसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनी, मोदींनी भाषणात लोकांच्या वेदना, त्यांचे ओझे, त्यांची आर्थिक चिंता कशी कमी करावी याविषयी काहीही म्हटले नाही. भविष्याविषयी किंवा लॉकडाऊननंतर काय याविषयी कोणतीही माहिती दिली नाही. पंतप्रधान फक्त शो बाजी करत आहेत, अशी टीका केली आहे.
Listened to the Pradhan Showman. Nothing about how to ease people’s pain, their burdens, their financial anxieties. No vision of the future or sharing the issues he is weighing in deciding about the post-lockdown. Just a feel-good moment curated by India’s Photo-Op PrimeMinister!
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) April 3, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.