HW News Marathi
मुंबई

समलैंगिकता गुन्हा नाही, न्यायालयाच्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत

मुंबई । समलैंगिकता गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे द हम सफर ट्रस्टने जल्लोषात स्वागत केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली ५ सदस्यसीय खंडपीठानी हा निर्णय दिला आहे.

तसेच प्रत्येकाला स्वत:ची स्वतंत्र ओळख आहे. आधी केलेल्या चुका आता सुधारण्याची गरज असून प्रत्येकाला समानतेचा अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटले.गेल्या अनेक वर्षापासून द हम सफर ट्रस्ट अनेक वर्षापासून दोन समलैंगी व्यक्ती स्वत:च्या मर्जीने लैंगिक संबंध ठेवणे हा गुन्हा नाही. यासाठी झटत असल्याचे सांगितले.

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

भारतीय दंड विधानातील कलम ३७७ वर १० जुलैपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली. यानंतर न्यायालयाने दोन्ही पक्षनी केलेल्या दाव्याचे सनर्थनार्थ २० जुलै पर्यंत लिखित स्वरुपात युक्तीवाद सादर करण्यास सांगितला होता.

समलैंगिक संबंध गुन्हा नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्या आम्हाला प्रचंड आनंद होत आहे. न्यायालयाने आमच्या मानवाधिकाराचा विचार करुन हा निकाल दिल्याने आमचा समान केला असल्याचे उर्मी जाधव यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उर्मिला अभिनय नव्हे तर सॉफ्टपॉर्नसाठी ओळखली जाते ! कंगनाच्या टिकेनंतर बॉलिवूड संतप्त

News Desk

स्विफ्ट कारमधील तिघांचा जळून मृत्यू.. घातपाताची शक्यता ?

News Desk

वृत्तनिविदेकच्या अंगावर नारळाचे झाड कोसळले.CCTV

News Desk