HW News Marathi
मुंबई

आता पश्चिम रेल्वेच्या महिला डब्ब्यावर दिसणाऱ्या ‘स्त्री’चा लोगो बदलला

मुंबई | महिला या प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात. काळानुसार महिलांचा पेहरावही बदलत चालला आहे. याची दखल मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलने घेतली आहे. लोकलच्या महिलांच्या डब्यावर असणाऱ्या पारंपारिक वेषातील साडीमधील महिलांचा लोगो आता बदलणार असून त्या जागी आता फॉर्मल पेहराव केलेली महिलेचा फोटो येणार आहे. लोकलच्या ११० डब्यांवर हा नवा लोगो दिसणार आहे.

कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये महिला मोठ्या संख्येने काम करीत आहेत. या महिला फॉर्मल पेहरावात दिसून येतात. त्यामुळे लोकलच्या डब्यांवर आधुनिक महिलेचे चित्र रेखाटण्यात आले आहे. या चित्रामुळे आधुनिक महिलेचे प्रतिनिधित्व होते असे मानले जाते. तसेच विविध क्षेत्रांमध्ये कर्तुत्व गाजवणाऱ्या महिलांची माहिती डब्याच्या आत दिसणार आहेत. ऑलिम्पिकपटू आणि बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल, क्रिकेटर मिथाली राज, महिला अंतराळवीर कल्पना चावला यांची संपूर्ण माहिती डब्याच्या आतमध्ये पहायला मिळणार आहे. सध्या दोन लोकलमधील डब्यांमध्ये हा बदल करण्यात आला असून काही आठवड्यात उर्वरित पूर्ण केले जाईल.

 

Related posts

संजय राऊतांचा जामीन रद्द होणार? पत्राचाळ घोटाळाप्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी

Chetan Kirdat

उल्हासनगर: अनधिकृत बांधकाम करताना मजूराचा मृत्यू

News Desk

मुंबई विद्यापीठाचे उत्कृष्ट महाविद्यालये, आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

News Desk