HW News Marathi
Covid-19

फार्मा कंपनीच्या मालकासाठी फडणवीस थेट पोलिस ठाण्यात का गेले ? काय आहे कारण ?

मुंबई| महाराष्ट्रात कोरोना रूग्णसंख्या झपाट्याने वाढतेय ,यामुळे कोरोना रूग्णांना देण्यात येणाऱ्या रेमडोसीवीर इंजेक्शनचा तुटवडाही जाणवत आहे.रेमडेसीवीर पुरवण्यात केंद्र सरकार महाराष्ट्रासोबत भेदभाव करतयं असा आरोप नवाब मलिक यांनी केला. खरतरं काही दिवसांपूर्वी भाजप नेत्यांच्या विनंतीवरुन महाराष्ट्राला 50 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन द्यायला तयार झालेल्या ब्रुक्स फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना काल मध्यरात्री पोलिसांनी ताब्यात घेतलं,फडणवीस थेट पोलिस ठाण्यात पोहोचले आणि मग राज्यसरकार विरूद्ध विरोधी पक्ष हे राजकारण पेटलं.

फडणवीस ‘त्या’कंपनीच्या मालकासाठी पोलिस ठाण्यात का गेले ?

काहीच दिवसांपूर्वी विधापरिषदेचे विरोधा पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप आमदार प्रसाद लाड हे दमणच्या कंपनीत रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स मिळावे यासाठी गेले होते . त्यावेळी कंपनीने आम्हाला केंद्राची परवानगी मिळाल्यास आम्ही रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा सर्व साठा महाराष्ट्राला द्यायला तयार आहोत, असे सांगितले. त्यानुसार मी केंद्र सरकारशी बोलून परवानगी घेतली होती. त्यानंतर कंपनीने काही साठा महाराष्ट्रात पाठवलाही होता,असे फडणवीस म्हणाले.

मात्र, शनिवारी दुपारच्या सुमारास ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याच्या ओएसडीने ब्रुक्स फार्माचे मालक राजेश डोकानिया यांना फोन करुन धमकी दिली. तुम्ही देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरांच्या म्हणण्यावर रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स लगेच कशी दिलीत, असा सवाल त्यांनी डोकनिया यांना विचारला. त्यानंतर संध्याकाळी काही पोलीस कर्मचारी डोकनिया यांच्या घरी गेले आणि त्यांना उचलून इकडे आणलं. त्यामुळे मला आणि भाजपच्या नेत्यांना इतक्या तातडीने पोलीस ठाण्यात यावे लागले, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

या सगळ्या प्रकरणावर पोलिसं काय म्हणाले ?

मध्यरात्री घडलेल्या या सगळ्या नाट्यमय घडामोडींवर मुंबई पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे. मुंबई पोलिसांनी राजेश डोकानिया यांना केवळ चौकशीसाठी ताब्यात घेतले होते असे स्पष्ट केले. डोकानिया यांच्याकडे 60 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा साठा होता, त्यामुळे आम्ही त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीदरम्यान राजेश डोकानिया यांनी सर्व कायदेशीर कागदपत्रे दाखवल्यानंतर आम्ही त्यांना सोडून दिले, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेला संबोधित करणार

News Desk

आज धारावीत ४६ नवे कोरोना रुग्णांची नोंद, तर एकूण संख्या ९६२ पोहोचली

News Desk

महापुरुषांच्या यादीत छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख करावा !

News Desk