HW News Marathi
मुंबई

शिवस्मारकाची रचना बदलणार ?

मुंबई | अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या बहुचर्चित शिवस्मारकाच्या रचनेत मोठा बदल केला जाण्याची शक्यता आहे. शिवस्मारक समिती आता गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील उभा पुतळा तयार करण्याच्या विचारात असल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वी शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र आता शिवस्मारक समितीसमोर आणखी काही पर्याय उपलब्ध असल्याची माहिती मिळत आहे.

गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा १५२ मीटरचा असून अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांचा पुतळा १५३ मीटर उंचीचा असू शकतो, असेही म्हटले जात आहे. सरदार पटेल यांच्या पुतळ्याप्रमाणे हा उभा पुतळा असेल. या पुतळ्याची उंची १५३ मीटर इतकी असेल, अशी माहिती मिळत आहे. गेल्याच महिन्यात सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाच्या प्रकल्पाचे काम सुरू करू नका, असे तोंडी निर्देश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अतिवृष्टीत काम करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांची  ज्ञानदा प्रबोधन संस्थेने घेतली दखल

News Desk

बुचर बेटावरील इंधनाच्या टाकीला भीषण आग

News Desk

कुर्ला क्रांतीनगरचे पुनर्वसन करा, नगरसेवक संजय तुर्डे यांची मागणी

News Desk