HW News Marathi
मुंबई

वसूल केलेला GST परत करणार का?: उद्धव ठाकरे

मुंबई: उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवनात तातडीची पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र सरकारने जीएसटी दरात कपाती केल्याबदल त्यांचं अभिनंदन केले.पण आता इतके दिवस वसूल केलेला GST परत करणार का असा सवाल, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. जीएसटीमध्ये बदल म्हणजे सरकार ताळ्यावर आल्याचं लक्षण आहे, असंच जागं राहून आवाज उठवल्यास सरकार झुकेल, असे आज शिवसेना भवनात घेतलेल्या परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले.

 

उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद मुद्दे

 

जीएसटी दरबदलाबद्दल केंद्रसरकारचं अभिनंदन – उद्धव ठाकरे

  • भारनियमनामुळे झळा बसतायेत, तात्पुरता दिलासा नको,कोळशाचा तुटवडा होणार हे आधी कळालं नाही का?
  • केंद्र सरकारला हेच सांगाचंय- जनतेच्या असंतोषाचा उद्रेक होऊ देऊ नका
  • जीएसटीमध्ये बदल करण्याचा निर्णय, सरकारनं दिवाळीची भेट दिलीये असं चित्र निर्माण करण्यात आलं.
  • दिवाळीत त्रास देणार नाही ही मोदींची भेट असेल, उद्धव ठाकरेंचा टोला
  • रेल्वेच्या फुटओव्हर ब्रीजवरील फेरीवाल्यांचा प्रश्न शिवसेनेमुळे सुटला
  • अंगणवाडीसेविकांच्या संपावर तोडगा काढल्याने राज्य सरकारचे आभार : उद्धव ठाकरे
  • केंद्र सरकारने सर्वसामान्यांकडून लक्ष्मी ओरबाडून घेतली : उद्धव ठाकरे
  • महागाई, पेट्रोलचे दर कमी व्हायला हवी- उद्धव ठाकरे
  • मोदींनी चांगले निर्णय घेतले तर कौतुक करतोच, अन्यथा आमची आंदोलनं सुरुच आहेत
  • जीएसटी म्हणून एवढे दिवस वसूल केलेला कर सरकार परत करणार का? : उद्धव ठाकरे
  • करवापसीबद्दल अभिनंदन, मग इतके वर्षे वसूल केलेला कर परत करा
  • मस्तवाल सत्ताधाऱ्यांना जनतेने झुकवलं
  • ‘तत्वत:’ नको, तर पूर्ण भारनियमन तातडीने रद्द करा, लोकांचा अंत पाहू नका,
  • व्यापाऱ्यांचं अभिनंदन, मात्र, जनता अजून सुखी नाही.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्या या वर्षातला शेवटचा मेगाब्लॉक 

News Desk

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध

News Desk

सावधान मुंबईकरांनो, चायनीज गाड्यांवर निकृष्ट दर्जाचे चिकन

News Desk