HW News Marathi
मुंबई

मलबार हिलचेही नामांतरण होणार ?

मुंबई | मुंबईत नामकरणाच्या मागण्या जोर धरु लागल्याचे चित्र पहायला मिळत आहेत. एल्फिन्स्टन रोड स्थानकाचे नामकरण प्रभादेवी केल्यानंतर आता लवकरच मलबार हिलचेही नामांतरण होण्याची शक्यता आहे. मुंबईतील उच्चभ्रू लोकवस्ती असलेल्या मलबार हिल भागाचे नामकरण रामनगरी असे करण्याची मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे महापालिकेच्या महासभेपुढे करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सुधार समितीचे अध्यक्षपदही मिळविणारे दिलीप लांडे यांनी या नामांतराची मागणी केली आहे.

मलबार हिल हे नाव ब्रिटिश काळापासून उच्चारले जाते. मात्र मलबार हिल भाग प्राचीन असून सीतामातेच्या शोधात निघालेलेप्रभू रामचंद्र व लक्ष्मण यांनाही या भागाची भुरळ पडली. त्यांनीही या भागात काही काळ वास्तव्य केल्याचे बोलले जाते. त्यामुळे मलबार हिलचे नाव बदलून ‘रामनगरी’ करावे, अशी मागणी त्यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे. अशा प्रकारची नामकरण करण्याची मागणी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. सध्या मलबार हिलच्या नामकरणाची मागणी प्रस्ताव स्वरूपात पुढे आली आहे. ही ठरावाची सूचना महापालिकेच्या महासभेत मंजूर करण्यात येईल. तो मंजूर झाल्यानंतर महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोया प्रकरणाचे सत्य बाहेर कधी येणार | पृथ्वीराज चव्हाण

News Desk

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतना संदर्भात प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती

News Desk

ऐतिहासिक वास्तू, संस्कृती, निसर्ग चित्रांचे प्रदर्शन

News Desk