HW Marathi
मुंबई

दिवा रेल्वे स्थानकात महिला प्रवाशांचा ‘रेल रोको’, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

ठाणे | मध्य रेल्वेच्या दिवा स्थानकात महिला प्रवाशांनी जलद लोकल कर्जत आणि कसाऱ्याववरून येते असल्यामुळे प्रवाशांना डब्यात चढता येत नाही, या कारणामुळे आज (४ एप्रिल) सकाळी दिवा रेल्वे स्थानकातील फलाट क्र. ४ येथे महिला प्रवाशांनी रेल रोको केल्याची माहिती मिळाली आहे. रेल्वे रुळावर जाऊन १० मिनिटे महिलांनी आंदोलन केले. तसेच  मुंबईच्या दिशेने  येणारी लोकल महिला प्रवाशांनी रोखून धरली काही वेळ रोखून धरली होती. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू आहे.

दिवा स्थानकात आज सकाळी ६.५६ मिनिटांची मुंबई सीएसएमटीला जाणारी जलद लोक आली असताना, या लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या डब्यात दरवाज्यात उभ्या असलेल्या महिलांमुळे दिवा स्थानकातील महिलांना डब्यात प्रवेश न करता आल्यामुळे संताप महिला प्रवाशांनी दरवाजात उभे असलेल्या महिलांना खाली खेचले आणि रेल्वे रुळावर उतरल्या. या संपूर्ण प्रकारमुळे लोकल १५ मिनिटे रोखून धरली. यामुळे मध्य रेल्वेची अप मार्गावरील लोकसेवा विस्कळीत झाली आहे.

 

 

Related posts

सीएनजी, पीएनजीचे भाव वधारले

News Desk

इंद्रायणीकाठी विवाहितेसह प्रियकराने संपविले जीवन

News Desk

खासदार संजय राऊत यांच्यावर बेळगावमध्ये गुन्हा दाखल

News Desk