HW News Marathi
मुंबई

महिला शिवसैनिकांनी विभागप्रमुखाच्या कानशिलात लगावली

मुंबई | महिला शिवसैनिकांनी ईशान्य मुंबईचे विभागप्रमुख राजेंद्र राऊत यांच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. राजेंद्र राऊत हे कार्यक्रमानिमित्ताने गोवंडी येथे गेले असताना ही घटना घडली.या प्रकरामुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला.

 

शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिका-यांच्या नियुक्तीवरुन हा वाद सुरू झाल्याचे समजते. राजेंद्र राऊत मंचावरुन खाली आल्यानंतर महिला शिवसैनिकांनी त्यांना घेराव घातला. त्याचवेळीस एका महिलेने त्यांच्या कानशिलात लगावली.या घटनेनंतर कार्यक्रमात एकच खळबळ उडाली होती. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.

  • राजेंद्र राऊत यांच्या नियुक्तीवरुन वाद

राजेंद्र राऊत आणि शिवसैनिकातील नियुक्तीवरुन झालेल्या वादाची ही काय पहिलीच घटना नाही. महिना भरापुर्वी घाटकोपर पश्चिममधील शाखा क्रमांक १२९च्या शाखाप्रमुख पदावरुन वाद पेटला होता. तेव्हा जुन्या शिवसैनिकांना प्राधान्य देण्यापेक्षा नव्याने पक्षात आलेल्या लोकांना पद देण्यात आल्याचा आरोप शिवसैनिकांनी राजेंद्र राऊत यांच्यावर केला होता. काही शिवसैनिकांनी घाटकोपर परिसरात पोस्टर लावून नवनियुक्तीवर नाराजी व्यक्त केली होती. या पोस्टरमध्ये नवनियुक्ती करण्यात आलेल्या पदाधिका-यांची नावे, पुर्वी ते कोणत्या पक्षात होते, शिवसेने त्यांना कोणते पद देण्यात आले, असे पोस्टर लावण्यात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी, 22 जणांचा मृत्यू video

News Desk

संभाजी भिडेंनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची मंत्रालयात जाऊन घेतली भेट

Aprna

Independence Day | स्वातंत्र दिनानिमित्त मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंना तिरंग्याची रोषणाई

News Desk