HW News Marathi
मुंबई

चुनाभट्टीत मद्यधुंद कारचालकाच्या धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू

मुंबई | चुनाभट्टी परिसरात भरधाव कारने फूटपाथवर चालणाऱ्या तरुणीला धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. चुनाभट्टी येथील धावजी मार्गावर काल (६ डिसेंबर) रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास एमएच ०५ बीजे ३९२० क्रमांकाची असलेली कार दत्त मंदिर जवळून व्ही. एन. पूरव मार्गावर जात होती. त्यावेळी कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. या कारमध्ये एकूण तीन तरुण होते आणि ते मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. गाडीत चालकातील दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.

या अपघातात अर्चना पारठे वय (१९वर्षे) तरूणीला धडक मृत्यू झाला. तर दुसऱ्या जखमी तरुणीला शेजारील दळवी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पारठे कुटुंबाने चुनाभट्टी पोलिस चौकीला घेराव घालत ठिय्या आंदोलन केलं. जोपर्यंत वाहन चालकाला अटक केली जात नाही, तोपर्यंत मृत्यू अर्चना पार्टेचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईक आणि चुनाभट्टीतील रहिवाशांनी नकार दिला होता.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

News Desk

लता मंगेशकर यांच्या संगीताच्या प्रवासाचा सखोल अभ्यास

News Desk

वसूल केलेला GST परत करणार का?: उद्धव ठाकरे

News Desk
महाराष्ट्र

युती तुटल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी मोदी, शहांचे स्वागत

News Desk

पुणे । विधानसभा निवडणुकीनंतर युतीत फुट पडल्यावर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे हसत मुखाने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणून पुण्याच्या विमानतळावर स्वागत केले. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोदींच्या स्वागतासाठी उपस्थित होते. देशभरातील पोलीस महासंचालकांच्या येत्या तीन दिवसांची परिषद पुण्यात आयोजन करण्यात आली आहे. या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काल (६ डिसेंबर) पुण्यात आले आहे.

देशभरातील पोलीस महासंचालकांच्या तीन दिवसांच्या परिषदेचे आयोजन यावर्षी पुण्यात करण्यात आले आहे. या परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस तर गृहमंत्री अमित शहा तीन दिवस पुण्यात असणार आहेत. पुण्यातील पाषाण भागातील पोलीस रिसर्च सेंटर आणि आयसर या दोन संस्थांमध्ये ही तीन दिवसीय परिषद चालणार आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यासोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल , गुप्तचर विभागाचे प्रमुख अरविंद कुमार , गृविभागातील वरिष्ठ अधिकारी आणि देशातील वेगवगेळ्या राज्यांचे पोलीस महासंचालक उपस्थित राहणार आहेत.

निवडणुकीनंतर भाजप-शिवसेना यांच्या अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदावरून सत्ता संघर्ष निर्माण झाला होता. या पाश्वभूमीव शिवसेना एनडीएतून बाहेर पडली असून आता काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना महाविकासआघाडीच्या रुपाने राज्यात नवे राजकीय समीकरण पहायला मिळले आहे. महाविकासआघाडीचे नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करत आहेत.

पोलीस महासंचालकांच्या परिषदेसाठी मान्यवरांची उपस्थिती

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार संजय काकडे, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे तसेच मुख्य सचिव अजोय मेहता, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जैसवाल, गुप्त वार्ता विभागाचे संचालक अरविंद कुमार, एअर कमांडर राहुल भसीन, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, लेफ्टनंट जनरल दीपेंद्रसिंग आहुजा, जिल्हाधिकारी नवल किशोर राम तसेच योगेश गोगावले, जयंत येरवडेकर, गणेश बिडकर आदी उपस्थित होते. देशातील पोलीस महासंचालक यांच्या राष्ट्रीय पातळीवरील परिषदेला उपस्थित राहण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पुण्यात आले आहेत.

 

 

Related posts

चाकण मधील जाळपोळीत बाहेरच्या लोकांचा हात, पोलिसांचा संशय  

News Desk

महविकासआघाडीची वर्षपूर्ती! जाणून घेऊयात सरकारची महत्वाची कामगिरी…

News Desk

४ माध्यमांमध्ये शैक्षणिक चॅनल सुरु करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य

News Desk