मुंबई | रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज खेळणाऱ्या भारतीय संघातील दोन माजी खेळाडूंना करोनाची लागण झाली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पाठोपाठ आता युसूफ पठाणलाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचं काल रात्री समोर आलं. युसूफने स्वतः ट्विट करत याची माहिती दिली आहे. काल सचिन तेंडुलकरला कोरोना झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर रात्री युसूफने त्याला करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली.
काल (२७ मार्च) रात्री युसूफ पठाणने ट्विट करून करोनाची लागण झाल्याची माहिती दिली. ““माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला सौम्य लक्षणं आहेत. त्यामुळे मी घरातच क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. मी आवश्यक ती सर्व खबदरदारी आणि औषध घेतली आहेत. दरम्यान, माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी लवकरात लवकर कोरोना चाचणी करुन घ्यावी, अशी मी विनंती करतो”, असं युसूफने ट्विट करून म्हटलं आहे.
I've tested positive for COVID-19 today with mild symptoms. Post the confirmation, I have quarantined myself at home and taking all the necessary precautions and medication required.
I would request those who came in contact with me to get themselves tested at the earliest.
— Yusuf Pathan (@iamyusufpathan) March 27, 2021
सचिन तेंडुलकरलाही कोरोना
‘कोरोना व्हायरसपासून बचावासाठी मी सर्व खबरदारी घेत होतो. या व्हायरसची काही लक्षणे जाणवल्यानंतर मी चाचणी केली. त्याच रिपोर्ट आला असून तो पॉझिटिव्ह आला आहे. घरातील अन्य सदस्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे सचिनने पोस्टमध्ये म्हटले आहे. मी स्वत:ला घरी होम क्वारंटाइन करून घेतले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी योग्य अशी काळजी घेत आहे’, असे ट्विट करत सचिनने स्वतः माहिती दिली होती.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 27, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.