मुंबई | जोगेश्वरीच्या युवा जिद्दी मराठा पथकाने महाराष्ट्र पोलिसांना सलामी देत त्यांच्याबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे. कायमच लोकांच्या संरक्षणासाठी ऑन ड्युटी 24 तास तत्परतेने हजर असणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांच्या कर्तृत्त्वाला सलाम करण्यासाठी या गोविंदा पथकाने मानवी मनोरे रचून एक रथ तयार केला होता. या पथकाने दादर येथील सुविधा लेनमधील भाजपाच्या माहीम-वडाळा विधानसभा आयोजित मानाच्या दहीहंडीला 7 थरांची उत्कृष्ट अशी सलामी देत त्यांच्या दिवसाची उत्साहात सुरुवात केली.
वॉर्ड क्रमांक 192 अध्यक्ष मनोज शहा आणि माहीम विधानसभेचे अध्यक्ष विलास आंबेकर यांनी भाजपच्या या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. गेल्या वर्षी जिद्दी मराठा गोविंदा पथकाने देशाच्या जवानांना आणि त्यांच्या अमूल्य कामगिरीला मानवंदना दिली होती. 10 वर्षांपूर्वी या गोविंदा पथकाची स्थापना झाली. तर 2 वर्षांपासून हे गोविंदा पथक दादर मधील दहीहंडी उत्सवासाठी येत आहे.
दरवर्षी नवनव्या संकल्पनांसह नव्या विचारासह हे गोविंदा पथक लोकांना एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्र पोलिसांना त्यांनी दिलेल्या या सलामीचे तेथे उपस्थित इतर सर्व गोविंदा पथकांनी कौतुक केले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.