HW News Marathi
मुंबई

उपनिबंधक महोदय, विक्रोळीच्या शिवकृपा सोसायटीवर कारवाई कधी ?

धीरज घोलप

मुंबई – सरकारचे सर्व नियम धाब्यावर बसवून सोसायटीचा कारभार चालवणाऱ्या गृहनिर्माण सोसायटीच्या संचालकांवर उपनिबंधकांकडून (म्हाडा) अद्यापही कारवाई झालेली नाही. याबाबत वारंवार तक्रारी करूनही कुठलीच कारवाई होत नसल्यानं सोसायटीतील रहिवाशी संतप्त झाले आहेत.

विक्रोळी पार्कसाईट परिसरात १९८७ मध्ये शिवकृपा गृहनिर्माण सोसायटी अस्तित्वात आली. तेव्हापासून २००१ पर्यंत सोसायटीचं कामकाज नियमानुसार चालायचं. मात्र, त्यानंतर आलेल्या संचालक मंडळानं शासकीय नियमानुसार सोसायटीचं कामकाज केलं नसल्याचं तक्रारीत म्हटलंय. सोसायटीच्या खर्चाचा १६ वर्षांचा लेखाजोखा नाही, लेखापरिक्षकांचा अहवालही सोसायटीच्या सदस्यांना दिला जात नाही, नियमानुसार संचालक मंडळाच्या निवडणूका नाही, सोसायटीबाबत कुठलाही निर्णय हा चर्चा किंवा बैठकीशिवायच घेतला जात असल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आलाय.

यासंदर्भात मुंबई उपनगरचे जिल्हा उपनिबंधक नितीन काळे यांनी संबंधित सोसायटीला आपलं म्हणणं मांडण्यासाठी दोन पत्र लिहिली आहेत. सोसायटीकडून अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही, अशी माहिती काळे यांनी दिलीय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोपर रेल्वे स्थानकात टीसीला मारहाण करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

News Desk

निष्टांवतांना डावलून नवख्यांना पद दिल्याने शिवसेनेत हाणामारी

Adil

नाताळच्या निमित्ताने किर्ती महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम

News Desk