HW News Marathi
मुंबई

उल्हासनगरातील शौचालयचा दुरावस्थेचा ठपका

गौतम वाघ

शहरातील स्वच्छतेचे मात्र कौतुक

उल्हासनगर — स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पाहणी दौरा करण्यासाठी आलेल्या दिल्लीच्या समितीने उल्हासनगरातील शौचालयांवर दुरावस्थेचा ठपका ठेवला आहे.एकीकडे शहरातील स्वच्छते बाबत समितीने पालिकेची कौतुकाने पाठ थोपटली असतानाच, शौचालयांच्या दुरावस्थेच्या ठपक्याने पालिके समोर या शौचालयांना निट नेटके करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

दिल्लीतील कॉलेटी कॉन्सील ऑफ इंडिया या समितीच्या वतीने प्रसाद एडेकर,सचिन संबेराव,जितेंद्र यादव,रोहित मिश्रा यांनी नुकतीच स्वच्छ भारत अभियान अंतर्गत उल्हासनगराचा पाहणी दौरा केला.त्यांनी आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांची भेट घेऊन प्रथम शहराची रोड,कचरा आदींची चित्रफीत बघिल्यावर,मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे यांच्या सोबत शौचालयांची पाहणी केली.शहर हागणदारी मुक्ततेच्या पालिकेने कोणते उपक्रम राबवले त्याचाही अहवाल घेतला.

विविध शौचालयांची पाहणी करताना,त्यात लाईट,पाणी नाही,भिंतींना तडे गेलेले,सीटच्या आजूबाजूला तुटलेली अवस्था,ड्रेनेजची व्यवस्था नसल्याने उघडयावर नालीतून वाहणारे शौच,तसेच दरवाजे नसल्याने पत्र्याचा,कापडांचा आधार घेऊन नागरिक शौचालयास बसतात.हे धक्कादायक चित्र समितीच्या निदर्शनास आले.शहर स्वच्छ दिसत आहे.रोडवर,कुंडयात कचरा दिसत नाही,नाल्यांची अवस्था ठीक आहे.असे चित्र असताना,शौचालयांच्या दुरावस्थे बाबत समितीने नाराजगी व्यक्त केली.

शौचालयांची आकडेवारी”

शहर सार्वजनिक 350 व एमएमआरडीए बांधलेले 160 शौचालये आहेत.पे अँड युज चे 40 शौचालये असून आणखीन 12 बांधून तयार आहेत. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत 15 हजार 500 नागरिकांनी त्यांच्या घरात शौचालये बांधली आहेत.400 शौचालये बांधण्याची प्रक्रिया सुरु आहे.मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे यांनी हि माहिती दिली.

दिल्लीच्या समितीने शौचालयांच्या दुरावस्थेवर ठपका ठेवल्या बाबत आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्याशी विचारणा केली असता,युद्धपातळीवर शौचालयांची दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार.सोबतच लाईट व पाण्याचे कनेक्शन जोडले जाणार.असे सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईच्या पावसाने घेतला पाच जणांचा बळी

News Desk

पीडितांना मिळणार तात्पुरता निवारा

News Desk

‘ट्री गणेशा’च्या रूपात बाप्पा राहणार आपल्यासोबत

swarit