HW News Marathi
मुंबई

ओमी कलानी यांचा उमेदवारी अर्ज बाद

( गौतम वाघ )

उल्हासनगर- ओमी कलानी याचा उमेदवारी अर्ज तिन मुले असल्यामुळे बाद झाल्याचे निवडणूक अधिका-यानी जाहीर केले आहे. ओमीने भारतीय जनता पार्टीकडून पॅनल 7 आणि 9 मधुन उमेदवारी अर्ज भरला होता. या निवडणुक अधिका-यांच्या निर्णयामुळे भविष्यात कोणतेही संवैधानिक पद ओमी कलानीला मिळवता येणार नसल्यामुळे उल्हासनगरच्या राजकारणाचे रिमोट कंट्रोल ओमीच्या हातात राहणार आहे.

याची पुर्व माहिती ओमीला असल्याने दोन्ही जागांवर मनोज लासी यांचा उमेदवारी अर्ज भरला असुन पत्नी पंचमला ही निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. उल्हासनगर शहरामध्ये मागील तिन वर्षापासुन ओमी कलानींचे नाव सर्वाधिक चर्चेत होते. आमदार ज्योती कलानींच्या विजयात ओमी कलानींचा मोठा होत असल्यामुळे टिम ओमी कलानी बनवत उल्हासनगरचा भावी महापौर म्हणुन ओमीचा प्रचार केला जात होता. उल्हासनगरातील भाजपचा हा ओमी कलानी हा नैसर्गिक विरोधक असतानाही त्याच्या वाढत्या वजनामुळे भाजपने ओमी बरोबर युती केली होती. या युतीचा उमेदवार म्हणुन ओमीने पॅनल 7 आणि 9 मधुन उमेदवारी अर्ज दाखल केला होता. याच पॅनलमधुन उमेदवारी अर्ज भरलेले रिपाई आठवले गटाचे भगवान भालेराव यानी छाननीच्या वेळी ओमी कलानीला महाराष्टÑ महापालीका अधिनियम कायद्यातील तरतुद 10 नुसार दोन पेक्षा अधिक अपत्य असल्याने ओमीचा अर्ज बाद करण्याची मागणी केली होती. यावेळी ओमीचे वकील नंदू चव्हाण यानी हे प्रकरण कल्याण न्यायालयात न्यायप्रविष्ठ असल्याचे कारण पुढे करीत याप्रकरणी निणर्य घेतल्यास कोर्टाचा अवमान होत असल्याचे सांगितले. मात्र त्याला भगवान भालेराव यांच्या वकीलाने उत्तर देताना ओमीची पहिली घटस्फोटीत पत्नी परीना हिला 2001 मध्ये अंश हा मुलगा आहे. तसेच ओमीची दुसरी पत्नी पंचमला निव आणि द्रुव हि दोन मुले आहेत. हि माहिती उमेदवारी अर्ज भरताना ओमीने लपवत फक्त दोनच मुले असल्याचे जाहीर शपथपत्रात नमुद केले होते. त्यामुळे अखेर निवडणुक अधिकारी रविंद्र हजारे यानी ओमी कलानीला निवडणुक लढविण्यास अपात्र ठरवत उमेदवारी अर्ज बाद केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीसह मुंबईतील बीबीसीच्या कार्यालयावर आयकर विभागाचे छापे

Aprna

महापरिनिर्वाण दिनासाठी चैत्यभूमीवरील सोयीसुविधांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

Aprna

सिद्धिविनायकाच्या दर्शनाने मुंबईकरांनी केली नववर्षाची सुरुवात

News Desk