HW News Marathi
मुंबई

गांधीजींचे छायाचित्र हटवून सरकारने केला राष्ट्रपित्याचा अवमान

खादी ग्रामोद्योगातून गांधीजींचे छायाचित्र हटविण्यावर खा. अशोक चव्हाण यांची टीका

मुंबई खादीचा प्रचार-प्रसार आणि उत्पादन करणा-या खादी ग्रामोद्योग आयोगाच्या कॅलेंडर व डायरीवरून महात्मा गांधी यांची चित्रे हटवून त्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र छापण्यात आले असून, सरकारला स्वस्तुतीचा आजार जडल्याची खरमरीत टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली.

खादी ग्रामोद्योग आयोगाच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना खा. चव्हाण म्हणाले की, खादीच्या माध्यमातून महात्मा गांधी यांनी देशवासियांना स्वावलंबनाचा संदेश दिला. त्यांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी 1956 मध्ये खादी व ग्रामोद्योग आयोगाची स्थापना करण्यात आली होती. प्रत्येक राज्यात स्वतंत्र मंडळे काम करतात. ही प्रेरणा सदोदीत रहावी यासाठी खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडर व डायरीवर चरख्याने सुतकताई करतानाचे गांधीजींचे छायाचित्र छापण्यात येत होते. त्याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र छापून सरकारने कहर केला आहे. या सरकारला स्वस्तुतीचा आजार जडला आहे. स्वतःचा उदो-उदो करून घेण्यासाठी चुकीचा पायंडा पाडला जात आहे. महात्मा गांधीजींच्या ठिकाणी चक्क पंतप्रधानांचे छायाचित्र प्रकाशित करणे म्हणजे राष्ट्रपित्याचा अवमान आहे. या प्रकरणी सरकारने माफी मागावी असे खासदार चव्हाण म्हणाले. आधीदोन हजार रूपयांच्या नोटेवरून गांधीजींना गायब करण्याचे प्रयत्न झाले आता खादी ग्रामोद्योगमधून हटविण्याचे काम सुरु आहे. कथनी आणि करणीमध्ये अंतर असलेले सरकार सत्तेत बसले आहे. लोकांच्या ह्रदयातील गांधीजी तुम्हाला कदापी पुसता येणार नाहीत. सत्तेत बसताना, सर्वांदेखत गांधीजींच्या छायाचित्रासमोर नतमस्तक व्हायचे आणि दुसरीकडे प्रचार आणि प्रसार साहित्यावरून गांधीजींचे छायाचित्र पुसायचे, या दुटप्पीपणातून सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे, असेही खा. चव्हाण म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्य रेल्वेचा आज विशेष मेगाब्लॉक

News Desk

लालबागमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट २० जण जखमी

News Desk

निवासी डॉक्‍टरांना थेट प्रशासनापुढे समस्या मांडता येणार

News Desk