HW News Marathi
मुंबई

चीनी चोरट्यांनी मुंबईतून चोरला ३४ लाखांचा हिरा

मुंबई ५.४३ कॅरेटचा आणि तब्बल ३४ लाख रुपये किमतीचा हिरा चोरून देश सोडण्याच्या तयार असलेल्या दोन चीनी चोरट्यांना मुंबईतील वनराई पोलिसांनी अटक केली आहे. चियांग चांग क्विंग आणि डेंग जियाबो अशी या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून, मोबाइल, चीनी पासपोर्ट आणि सामानातील शॅम्पूच्या बाटलीतून चोरलेला हिरा हस्तगत करण्यात आला आहे. पळून जाण्याच्या तयारीत असताना विमानतळावरच त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या.

२७ ते ३१ जुलैदरम्यान इंडिया इंटरनॅशनल जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी असोसिएशनने भरवलेल्या प्रदर्शनात देशाबाहेरूनही सराफा व्यावसायिक हिरे, हिरेजडित दागिने घेऊन सहभागी झाले होते. दोन्ही चोरटे चीनी रविवारी सकाळी प्रदर्शनात सहभागी झाले होते. एकाच स्टॉलवर ते खूप वेळ रेंगाळले. त्यांनी हिरे पाहिले व नंतर ते ठेवून निघून गेले. संध्याकाळच्या सुमारास प्रदर्शन संपल्यानंतर आवराआवर करताना एक हिरा बोगस असल्याचे स्टॉलवरील कर्मचाऱ्याच्या लक्षात आले. पोलिसांनी तातडीने स्टॉलवर आलेल्यांना सीसीटीव्ही चित्रणाद्वारे पाहिले. त्यात या दोन चिनी नागरिकांच्या हालचाली संशयास्पद आढळल्या. त्यानंतर विशेष शाखेसह विमानतळावरील ‘सीआयएसएफ’च्या वरिष्ठांना संशयित चिनी नागरिकांबद्दल माहिती कळविण्यात आली.

हे दोन्ही चीनी नागरिक संध्याकाळी पाचच्या सुमारास विमानतळावर दिसले. त्यानंतर दुभाषाच्या मदतीने चौकशी करण्यात आली. तपासणीत त्यांच्याकडील शॅम्पूच्या एका छोटय़ाशा बाटलीत चोरलेला हिरा सापडला व काही खोटे हिरेही सापडले. या दोघांनी हातचलाखीने स्टॉलवरील खरा हिरा चोरला आणि जवळचा खोटा तेथे ठेवून काढता पाय घेतला, ते चोरीच्याच उद्देशाने मुंबईत आले होते, असे चौकशीत निष्पन्न झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांकडून लोकशाहीला काळीमा फासण्याचा प्रयत्न | विखे पाटील

News Desk

वेश्या व्यवसायातून सुटका झालेल्या तरुणीचे मोदींना पत्र

News Desk

काँग्रेसचे कालिदास कोळंबकर शिवसेनेच्या वाटेवर

News Desk