HW News Marathi
मुंबई

दिग्दर्शक निशिकांत कामत अजूनही जिवंत… रितेश देशमुख यांनी केले स्पष्ट

मुंबई | चित्रपट समीक्षकांच्या कायम पसंतीस उतरलेले प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे आज (१७ ऑगस्ट) निधन झाले अशी बातमी सगळीकडे पसरली आहे. मात्र, अभिनेता रितेश देशमुख यांनी ट्विट करत निशिकांत कामत अजूनही जिवंत असून व्हेंटिलेटरवर आहेत अशी माहिती दिली आहे.

दरम्यान, निशिकांत कामत यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर अनेक नेत्यांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. मात्र, रितेश देशमुख यांच्या ट्विट नंतर अजूनही ते हयात आहेत, हे स्पष्ट झाले आहे.

तसेच, रितेश देशमुख यांनी आणखी एक ट्विट करत सर्व मीडियाला विनंती केली आहे की त्यांनी निशिकांत कामत यांच्या निधनाची जी बातमी दिली त्यांना त्यावर स्पष्टीकरण द्यावे . अनेक नेत्यांनी, कलाकारांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली होती.अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी ट्विट करत निशिकांत कामत यांच्या निधनाच्या केलेल्या ट्विट बद्दल माफी मागितली आहे. आणि त्यांच्या साठी प्रार्थना देखील केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Dahi Handi | आयडियलची इकोफ्रेंडली दहीहंडी, पारंपरिक वाद्य वाजविण्याचा दिला संदेश

News Desk

सोशल मीडियावर ‘परतीचा पाऊस, पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून राज ठाकरेंचे मोदी-शहांना फटकारे

News Desk

संपादरम्यान बेस्टचे १९.८८ कोटींचे नुकसान

News Desk