HW News Marathi
मुंबई

नगरसेविका पत्नीच्या डोक्यात नारळ मारून प्रचाराला सुरूवात  

ठाणे – निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ उमेदवार वेगवेगळ्या प्रकारे करत असतात. मात्र ठाण्यातल्या प्रभाग १६ मध्ये शिवसेनेचे उमेदवार प्रचाराचा शुभारंभ करणार होते. यावेळी सेनेचे उमेदवार माणिक पाटील यांनी चक्क आपल्या पत्नीच्या डोक्यावर नारळ मारून निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. यामुळे पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ ठाणेकरांमध्ये चर्चेचा विषय झाला आहे.

प्रभाग १६ मध्ये प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी रविवारी माणिक पाटील हे दुसरे उमेदवार गुरूमितसिंग स्यान आणि नगरसेवक डॉ. जीतेंद्र वाघ यांच्यासह प्रचाराचा नारळ फोडणार होते. त्यावेळी संगिता पाटील तेथे आल्या. त्यावेळी माणिक पाटील आणि संगिता पाटील यांच्यात शाब्दिक चकमक झाली.

शिवसेनेकडून विद्यमान नगरसेविका संगिता पाटील यांचे तिकीट कापून त्यांचे विभक्त राहणारे पती माणिक पाटील यांना उमेदवारी दिली. यामुळे संतप्त झालेल्या नगरसेविका संगिता पाटील यांनी रविवारी प्रचाराचा नारळ देताना इतकी वर्ष कुठे होता, असा प्रश्‍न पती माणिक पाटील यांना विचारला. त्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. याचा राग येत माणिक पाटील यांनी हातातले नारळ पत्नीच्या डोक्यात घालून तिला जखमी केले.

मागील निवडणुकीत संगिता पाटील या खुल्या प्रवर्गातून निवडून आल्या होत्या. आरक्षण आणि खुल्या प्रवर्गात अन्य २ विद्यमान नगरसेवकांचे दावे प्रबल ठरल्याने पक्षाने तिकीट नाकारून पाटील यांच्या पतीला उमेवदारी दिली. यामुळे संगिता पाटील नाराज आहेत. दरम्यान माणिक पाटील आणि संगिता पाटील या दाम्पत्यामध्ये कौटुंबिक वाद असल्याने ते विभक्त राहतात. शिवाय माणिक पाटील यांनी दुसरा विवाह केल्याने कलह अधिकच वाढला आहे. यामुळे पाटील दाम्पत्याच्या भांडणाचा विषय ठाणेकरांसाठी चर्चेचा बनला आहे. अशाप्रकारची अनपेक्षित घटना घडल्याने उपस्थित अवाक् झाले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोनोरेलमध्ये टक्कर , दोन मोनोरेल एकाच ट्रॅकवर

News Desk

मुंबईला पुन्हा हाय अलर्टचा इशारा

News Desk

के.ई.एम. रुग्णालयात हृदयविकार पुनर्जीवन प्रात्‍याक्षिक संपन्‍न

swarit