HW News Marathi
मुंबई

पोटच्या मुलीसोबत शारीरिक संबंध-आरोपी अटक

पुणे, गेल्या सहा वर्षांपासून पोटच्या १२ वर्षीय मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवून बापाने तिला गर्भवती केल्याची घटना पुण्यात काल शुक्रवार (दि.१३) उघडकीस आली. ही बाब मुलीने सावत्र आईला सांगिल्यानंतर, आईने तिला मदत करण्याऐवजी तिला घराबाहेर हाकलून दिल्याचा संतप्त प्रकार घडला आहे. यानंतर मुलीने वाकड पोलिसात धाव घेऊन मदतीची याचना केल्यानंतर वाकड पोलिसांनी तिच्या आई- वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे.पुण्यातील काळेवाडी परिसरात सदर कुटुंब राहते. पीडित मुलीच्या आईचे काही वर्षांपूर्वी निधन झाल्याने ती वडील आणि सावत्र आईसोबत राहते. गेल्या सहा वर्षांपासून बापाने मुलीला धमक्या देऊन शारीरिक संबंध ठेवले. मुलीने नकार दिल्यास वडील तिला शिवीगाळ करून मारहाण करत होते. याबाबत मुलीने सावत्र आर्इला वेळोवेळी माहिती दिली. मात्र, तिने याकडे दुर्लक्ष करून मुलीलाच त्रास देणे सुरूच ठेवले. तसेच याबाबत कुठेही वाच्यता न करण्याची धमकी दिली.

तर काल शुक्रवारी मुलगी गरोदर असल्याचे समजताच सावत्र आईने तिला घराबाहेर हाकलून दिले. यानंतर मुलीने वाकड पोलिसात धाव घेऊन मदतीची याचना केली. यावेळी पोलिसांनी तिला धीर देत, तिच्या सावत्र आई आणि वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र याबाबत कुणकुण लागल्याने त्या मुलीचे आई वडील फरार झाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यातील पाणी नियोजनावर विधानसभेत चर्चा

News Desk

वसईत गोदामांना भीषण आग

swarit

पोलिसांची दडपशाही, छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांची धरपकड

News Desk