HW News Marathi
मुंबई

पुण्यासाठी शिवसेनेचा वचननामा

पुण्यात आज बुधवार (दि.८) रोजी शिवसेनेचा वचननामा जाहीर करण्यात आला. यामध्ये शिवसेनेने मोठ्याप्रमाणात नवनवीन उपाययोजना राबविण्याचे आश्वासन दिले आहे.

दरम्यान, १६२ जागांसाठी शिवसेनेचे १५६ उमेदवार रिंगणात दाखल झाले आहेत. यातील १४९ उमेदवार हे धनुष्य बाणाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत तर ७ जण पुरस्कृत उमेदवार आहेत. उल्लेखनीय म्हणजे पुण्यात शिवसेनेने सर्वांत जास्त उमेदवार दिले आहेत. त्यामुळे शिवसेनेसाठी पुण्यातील लढाईदेखील काट्याची टक्कर ठरणार आहे.

शिवसेनेच्या वचननाम्यातील काही मुद्दे…

रस्ते विकास करणार, उड्डाणपूल उभारणार

रिंग रोड विक्रमी वेळेत पूर्ण करणार

मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी महापालिकेचा स्वतंत्र कक्ष स्थापणार

पीएमपीलचा प्रवास येत्या ५ वर्षांत मोफत करणार

१ हजार ५०० नविन बसेसची खरेदी करणार

पारदर्शक कारभारासाठी ई – गव्हर्नन्सवर भर देणार

संपूर्ण शहराला २४ तास समान पाणी पुरवठा करणार

गरिबांना मोफत उपचारांसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच योजना राबवणार

स्वतंत्र कंपनी स्थापन करून झोपडपट्टी पुनर्वसन करणार

झोपडपट्टीवासियांचे सेवा शुल्क माफ करणार

पुणे शहर प्लास्टिकमुक्त करणार

प्रत्येक प्रभागात कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणार

शिक्षण मंडळाच्या शाळांचा दर्जा सुधारणार

ज्येष्ठ नागरिकांना मोफत औषधे देणार

राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजनेद्वारे महिलांना रोजगार

महिलांना सुरक्षा देणार

युवकांना रोजगार देणार

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई खड्डे मुक्त करण्यासाठी महापालिकेला ३१ मे ची डेडलाइन

News Desk

महापरिनिर्वाण दिनासाठी चैत्यभूमीवरील सोयीसुविधांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

Aprna

परमबीर सिंह का नाही बनले मुंबईचे पोलीस आयुक्त ?

News Desk