HW News Marathi
मुंबई

पायधुनी पोलिसांकडून पाकिटमारी करणारी टोळी अटकेत

 

मुंबई – मुंबईत पाकिटमारी करणाऱ्या चार जणांच्या टोळीला पायधुणी पोलिसांनी अटक केलीय. पेट्रोलिंग दरम्यान ही कारवाई करण्यात आली. हे चौघेही सराईत पाकिटमार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. यामध्ये महमद करीम शेख (वय 50, रा. मुंब्रा), बाबु राजू सोलंकी (वय 45, रा. धारावी), सय्यद रफिक नजीर अली (वय 64, रा. अंधेरी) आणि साजीद झुले (वय 39, रा. मुंब्रा) अशी अटक केलेल्या पाकिटमारांची नावं आहेत. है चौघेही बसेस आणि रहदारीच्या रस्त्यांवर पाकिटमारी करत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या चौघांच्या अटकेनंतर पाकिटमारीच्या अनेक घटना उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसे फेरीवाल्यांविरोधात पुन्हा आक्रमक, २० मार्चला फेरीवाल्याविरोधात आंदोलन

News Desk

मरण्यासाठीही आता ‘आधार’ हवे

News Desk

धूलिकणांनी मुंबईकरांचा श्वास कोंडला

swarit