HW News Marathi
मुंबई

पावसाचा मुंबईत कहर, अनेक ठिकाणी पाणी तुंबले, झाडे कोसळली

मुंबईः कल्याण- कल्याण-डोंबिवली शहर आणि ग्रामीण भागात मागील आठ दिवसापासून पाऊस पडत असून शुक्रवार पहाटे पासून जोरदार वाऱ्यासहित पावसाने हजेरी लावली. पावसादरम्यान 10 ठिकाणी झाड़े कोसळली तर एका ठिकाणी एक कार आणि 7 -8 मोटारसायकलचे नुकसान झाले आहे .

कल्याण डोंबिवली शहर आणि ग्रामीण भागात मागील 24 तासात 68 मि.मि. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. 1 जून 2017पासून आज(शुक्रवार) सकाळी 7 वाजेपर्यंत 1699 मि.मि. पाऊस पडला आहे. मागील आठ दिवस पडलेल्या पावसाने शहारतील रस्ते खड्डेमय झाले असून ते दुरुस्त करण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे . दरम्यान आज (ता. 21 जुलै) रोजी पहाटे पासून जोरदार वाऱ्या सहित पावसाने हजेरी लावली , यात पालिका क्षेत्रात 10 झाड़े कोसळली, कल्याण पश्चिम संघवी इस्टेट परिसरात झाड कोसळल्याने एक कार आणि 7-8 मोटारसायकलचे नुकसान झाले, अशी माहिती ब प्रभाग क्षेत्र अधिकारी प्रकाश ढोले यांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला बोलवण्यात आले आणि ते झाड़ बाजूला करण्यात आले. गौरी पाड़ा परिसर येथे सुद्धा झाड़ कोसळल्याने काही काळ त्या परिसरातील वाहतुक ठप्प झाली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Breaking News| अंधेरीच्या मधु इंडस्ट्रियल इस्टेटच्या एका इमारतीला आग

News Desk

भारतीय लष्करावर पादचारी पुल बांधण्याची वेळ !

News Desk

स्वत:च्या मृत्यूवरही त्यांनी रेखाटले होते व्यंगचित्र

News Desk