HW News Marathi
मुंबई

भाजपने ,रिपाइंसाठी सोडल्या १२ जागा 

गौतम वाघ

उल्हासनगर : शिवसेनेसोबत युती झाली अथवा नाही झाली तरी रिपाईला आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी १२ जागा देणारच अशी भूमिका भाजपच्या स्थानिक नेत्यांनी घेतली असून आज सोमवारी या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत हे जाहीर केले आहे .

भाजपचे जिल्हाध्यक्ष आयलानी , माजी उपमहापौर जमनु पुरूसवानी , माजी नगरसेवक लाल पंजाबी , राजा गेमनानी , नरेंद्र राजांनी , संजय सिंग , रिपाईचे जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव ,माजी जिल्हाध्यक्ष नाना बागुल , माजी नगरसेवक बी बी मोरे ,नाना पवार या नेत्यांच्या उपस्थितीत आज एक पत्रकार परिषद घेण्यात आली यात रिपाई पक्षाला पॅनल क्रमांक ४ मधून २ , पॅनल क्रमांक ७ मधून ३ , पॅनल क्रमांक ८ मधून १ , पॅनल क्रमांक १२ मधून २ , पॅनल क्रमांक १८ मधून ३ व एक अन्य जागा देण्यात येईल असे जाहीर केले आहे . अन्य ३ जागा देखील मिळाव्यात अशी रिपाईची मागणी आहे मात्र त्याबाबत चर्चा अजून चालू आहे . दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी यावेळी हे आवर्जून सांगितले कि सध्या भाजप -रिपाई हि नैसर्गिक युती असून शिवसेने सोबत युती होवो अथवा न होवो रिपाई पक्षाला जाहीर केलेल्या १२ जागा मिळणारच या पत्रकार परिषदेत ओमी कलानी व त्यांच्या सहकाऱ्यांना भाजप मध्ये प्रवेश देणार का असा सवाल कुमार आयलानी यांना विचारले असता ते म्हणाले कि ते आमच्या पक्षाचे प्राथमिक सदस्य सुद्धा नाहीत , आमच्या साठी त्यांचा मुद्दा गौण आहे . मात्र ओमी कलानी व त्यांचे सहकारी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याबाबत त्यांना विचारले असता आमचा कोणताही वरिष्ठ नेता ओमी कलानी यांना भेटला नाही असा आयलानी यांनी दावा केला .

गुन्हेगार प्रवुत्तीच्या नेत्यांच्या विरोधात आम्ही अनेक वर्षे लढा देत आहोत त्यामुळे ओमी कलानी यांच्यासारख्या वादग्रस्त नेत्याला पक्षात घेण्यास आमचा सक्त विरोध राहील असे माजी नगरसेवक नरेंद राजांनी यांनी सांगितले , काँग्रेसचे नगरसेवक गोदू कृष्णांनी यांच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल झाले आहेत मात्र त्यांना भाजपमध्ये कसा प्रवेश दिला असे पत्रकारांनी विचारले असता कृष्णांनी यांच्या विरोधात असलेले गुन्हे १६९ च्या अंतर्गत तपासाअंती निकाली काढण्यात आले आहे अशी सारवासारव भाजप प्रवक्ते राजा गेमनानी यांनी केली .

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वसई समुद्रात ‘मॉर्निंग स्टार’ बोट बुडाली, ६ जण बचावले

News Desk

मुंबईत हाय अलर्ट जारी, ऐन सणा-सुदीच्या वेळी नवे संकट

News Desk

भाजपकडून सतत ऑफर – नारायण राणे

News Desk