HW News Marathi
मुंबई

मध्यावधी निवडणुका झाल्या तरीही विजय आमचाच – अमित शहा

मुंबई – मध्यावधी निवडणुका झाल्याच तर विजय आमचाच होईल, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केलाय. सध्या शहा हे मुंबईच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यंतरी मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिले होते. त्यानंतर झालेल्या शेतकरी आंदोलनानं या संकेतांना बळकटी मिळू लागलीय. कुठल्याही क्षणी मध्यावधी निवडणुका झाल्याच तर आपणही तयार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यावर भाजपच्या अध्यक्षांनीही मध्यावधी निवडणुका झाल्याच तर आम्हांलाही लढावचं लागणार आहे, मैदान सोडून जाता येणार नाही, असं स्पष्ट केलंय. मध्यावधी निवडणुका झाल्याच तर विजय हा भाजपचाच होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

रविवारी शहा हे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमधील संबंधांमध्ये कटुता निर्माण झालीय. त्यावर राजीनामे खिशात घेऊन फिरत असल्याचं शिवसेनेचे मंत्री सांगतात. शिवसेना नेत्यांकडूनही मध्यावधी निवडणुकीसंदर्भातली वक्तव्यं अधूनमधून येत असतात. या पार्श्वभुमीवर अमित शहा यांना शिवसेनेसोबतच्या वादाबाबत विचारलं असता, तुम्हाला आतील गोष्टी सांगू असं वाटतंय का, असा माध्यमांनाच प्रतिप्रश्न करून या महत्त्वाच्या विषयावर भाष्य करण्याचं टाळलं.

अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारचंही कौतुक केलं. मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आलेलो नाही, मात्र एकूणच भाजपचे मंत्री चांगलं काम करत आहेत. याशिवाय राज्य सरकारनं शेतकरी आंदोलन त्यांनी चांगल्या पद्धतीनं हाताळल्याचं सांगत त्यांनी सरकारची पाठ थोपटली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वांद्रे प्रकरण : आदित्य ठाकरेंच्या ट्विटवर हरभजन सिंहने दिले उत्तर

News Desk

मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयातील जनता दरबार सर्वसामान्यांच्या तक्रारींचे निवारण करावे! – अस्लम शेख

News Desk

दूरदर्शन केंद्राच्या दुसऱ्या मजल्याला आग,अर्ध्या तासातच आग नियंत्रणात

News Desk