HW News Marathi
मुंबई

मुंबईत बत्ती गुल, ग्रिड फेल्युअरमुळे पूर्ण मुंबईत वीजपुरवठा खंडित

मुंबई | देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत वीज पुरवठा पूर्णपणे खंडीत झाला आहे. मुंबई आणि लगतच्या परिसरातील अनेक भागांतील वीजप्रवाह सोमवारी सकाळी अचानकपणे खंडित झाल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, लालबाग, परळ, अंधेरी, दादर, ठाणे, वडाळा आणि नवी मुंबई या भागातील लाईट गेली आहे. ग्रिड फेल्युअरमुळे हा बिघाड झाल्याचे समजते. अचानक लाईट गेल्यामुळे मुंबईतील पश्चिम आणि मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अनेक लोक ट्रेन सध्या ट्रॅकवर उभ्या आहेत. याशिवाय, मुंबई परिसरात असणाऱ्या कॉर्पोरेट कार्यालयांमधील कामकाजही लाईट गेल्यामुळे ठप्प झाले आहे.

हा बिघाड नक्की कशामुळे झाला याबाबत अद्याप खात्रीशीर माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. मात्र, बेस्टच्या काही अधिकाऱ्यांनी ग्रीड फेल्युअरमुळे हा प्रकार घडल्याची शक्यता वर्तविली आहे. मात्र, सध्या वीज पुरवठा करणाऱ्या सगळ्या यंत्रणा या बिघाडाचे कारण शोधण्यासाठी युद्धपातळीवर कामाला लागल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची सनद दोन वर्षांसाठी रद्द

Aprna

घाटकोपर ते वर्सोवा रोडदरम्यान मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड, प्रवाशांचे हाल

News Desk

उबरचे मुंबईतील कार्यालय कायमस्वरूपी बंद

News Desk