HW News Marathi
मुंबई

शिक्षक मतदार संघात बोगस मतदारांवर होणार कारवाई

पी.रामदास

दुप्पट मतदान झाल्याने जिल्हा निवडणुक आयोगाच्या रडारावर

मुंबई राज्यातील कोकण, औरंगाबाद आणि नागपूर शिक्षक मतदार संघासह नाशिक आणि अमरावती पदवीधर शिक्षक मतदार संघासाठी ३ फेब्रुवारीला मतदार होत असताना यात मतदानाचा अधिकार नसलेल्या आणि बोगसपणे नाव नोंदणी केलेल्या शिक्षक मतदारांवर निवडणूक आयोगाने लक्ष केंद्रीत केले आहे. मतदानाचा अधिकार नसताना एकाही बोगस मतदाराने मतदान केले तर त्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचे मंगळवारी आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले.

शिक्षक मतदार संघाच्या तीन मतदार संघापैकी कोकणातील रायगड जिल्ह्यात शिक्षक मतदारांची संख्या दुपटीने वाढली असल्याने हा मतदार संघ आयोगाच्या रडारवर आला आहे. त्यासाठी अनेक तक्रारी आयोगाकडे आल्या असून या चौकशीच्या आधारे अपात्र व बोगस मतदारांनी मतदान केल्यास त्यांच्यावर थेट कारवाई केली जाईल असे मुख्य निवडणूक आयोगाचे प्रधान सचिव अश्विनी कुमार यांनी सांगितले.

कोकण मतदार संघात होत असलेल्या निवडणुकीत यंदा नवीन तयार करण्यात आलेल्या मतदार याद्यांनुसार ३७ हजार ६७१ शिक्षक मतदारांची नोंद करण्यात करण्यात आली आहे. यात कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या जिल्ह्यातील माध्यमिक शाळांसोबतच आयटीआय, कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचा मतदार म्हणून नोंदणी करण्यात आली आहे. यात कायद्यातील तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद शिक्षक, पूर्व प्राथमिक शिक्षक हे मतदार होऊ शकत नाहीत. मात्र यंदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यासह अनेक ठिकाणी या शिक्षकांचीही मतदार म्हणून बोगसपणे नांदणी करण्यात आली असल्याने त्याविषयी विभागीय आयुक्त कोकण विभाग यांच्याकडे तक्रार आल्या आहेत. परंतु या विभागीय आयुक्तांनी अद्यापही यावर कोणतीही सुनावणी न घेतल्याने त्याची गंभीर दखल मंगळवारी मुख्य निवडणूक आयोगाचे प्रधान सचिव अश्विनी कुमार यांनी दिली.

रायगड जिल्हा रडारवर

राज्यातील शाळांमध्ये मागील पाच वर्षांपासून नवीन शिक्षक भरतीला बंदी आहे. यामुळे राज्यात होत असलेल्या औरंगाबाद, नागपूर मतदार संघातील शिक्षक मतदारांची संख्या वाढलेली नाही. परंतु केवळ कोकण मतदार संघातील रायगड या एकाच जिल्ह्यात मागील निवडणुकीत ५ हजारांच्या दरम्यान शिक्षक मतदारांची नोंद असताना यंदा त्यात तब्बल दुप्पट वाढ होऊन ही संख्या १०,००९ इतकी झाली आहे. यात मोठ्या प्रमाणात मतदानाचा अधिकार नसललेल्या प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद शिक्षक, पूर्व प्राथमिक शिक्षकच्या शिक्षकांची नोंदणी करण्यात आल्याने या मतदार संघात मोठ्या प्रमाणात बोगस मतदार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मतदान केल्यास निलंबन अटळ

शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत केवळ माध्यमिक शाळांतील शिक्षकांच्या पुढील कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांना मतदानाचा अधिकार आहे. त्यासोबतच आयटीआय मधील शिक्षकही मतदारासाठी पात्र असतात. मात्र यात कायद्यातील तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद शिक्षक, पूर्व प्राथमिक शिक्षक हे मतदार होऊ शकत नाहीत. अशा मतदारांना बोगस मतदार समजले जाते. तरीही या बोगस मतदारांनी मतदान केल्यास त्यांच्यावर निलंबनापासून ते बडतर्फीचीही कारवाई होऊ शकते.

नोदणी झालेले शिक्षक मतदार एकुण संख्या

पालघर जिल्हा ५,११५

ठाणे जिल्हा १५,७६३

रायगड जिल्हा १०,००९

रत्नागिरी जिल्हा ४,३२८

सिंधुदूर्ग जिल्हा २,४५६

एकुण ३७,६७१

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मरेच्या गणेशोत्सवासाठी १३२ विशेष गाड्या, ३० जुन पासून आरक्षण सुरु

swarit

पित्याला घराबाहेर काढणाऱ्या मुलाला अद्दल घडविण्यासाठी अमदाराची अनोखी शक्कल

News Desk

National Youth Day : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

News Desk