मुंबई: भायखळा कारागृहातील मंजुळा शेट्ये यांच्या हत्येचे प्रकरण ताजे असताना ठाण्यातील कारागृहात एका कैद्याने आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. स्वच्छतागृहाच्या लोखंडी गजाला टी-शर्टच्या सहाय्याने गळफास घेवून केली कैद्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु कारागृहात किंवा पोलिस कोठडीत होणाºया सर्व आत्महत्या स्वच्छतागृहातील लोखंडी गजाला गळफास घेऊन झाल्याचा सरकारचा अहवाल आहे. त्यामुळे सर्व आत्महत्या बनावट तर नाहीत ना, असा संशय घेण्यास जागा आहे.
आशिष अनुप बरणवाल (२२) या आरोपीने ठाणे कारागृहातील स्वच्छतागृहात आत्महत्या केली. तो डोंगरी-वसई येथील रहिवासी असून त्याला अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलत्कार केल्याप्रकरणी वाळूंज पोलिसांनी अटक केली होती. गेल्या १ वषार्पासून तो या तुरूंगात शिक्षा भोगत होता. दुसरा एक कैदी स्वच्छतागृहात गेल्याने हा प्रकार उघडकास आला होता. या प्रकरणी कारागृह प्रशासनाने सीसीटीव्हीच्या सहाय्याने चौकशी सुरु केली असून या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीसह स्थानिक पोलीस तसेच सीआयडीला चौकशीसाठी निवदेन देण्यात आले आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृहातील ही आत्महत्येची दुसरी घटना असून यापूर्वी ज्या कैद्याने आत्महत्या केली होती तो देखील बलात्कार प्रकरणातील आरोपी होता.
https://twitter.com/Mahabatmi1
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

previous post