HW News Marathi
देश / विदेश

अमेरिकेच्या मदतीने दिल्लीतून दहशतवादी अटकेत

नवी दिल्ली(वृत्तसंस्था) अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएच्या गुप्त माहितीवरून तुर्कीतून परतणाऱ्या आयसिसच्या हस्तकाला दिल्ली विमानतळावरुन अटक करण्यात आले. संशयितांकडून बनावट पासपोर्ट जप्त करण्यात आले.

केरळमधील कन्नूरचा रहिवासी असलेला ३० वर्षाचा तरुण बनावट पासपोर्टच्या आधारे तुर्कीत गेला होता. तुर्कीतील विमानतळावर त्या तरुणाला अटक करण्यात आली होती. संशयित हस्तक हा सीरियात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात होता. या तरुणाला पुन्हा भारतात पाठवण्यात आले होते. मंगळवारी दिल्ली विमानतळावर आगमन होताच दिल्ली पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने त्या तरुणाला अटक केली. संशयित हस्तकाचा आयसिसशी असलेल्या संबंधांचा सध्या तपास सुरू असून चौकशीनंतरच पुढील माहिती देऊ असे पोलिसांनी सांगितले. अटक केलेला तरुण हा सीरियातील आयसिसच्या दहशतवाद्यांच्या संपर्कात होता, अशी माहितीही समोर येत आहे. केरळमधून आयसिसमध्ये भरती होण्यासाठी सीरियात गेलेल्या तरुणांशीही तो संपर्कात होता, असा अंदाज आहे. या तरुणाने यापूर्वीही सीरियात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकरी आंदोलनातील हिंसाचार प्रकरणी २६ जणांवर गुन्हे दाखल

News Desk

शाहिद अब्बासी पाकचे नवे पंतप्रधान

News Desk

राहुल गांधींना टीम तयार करावीच लागेल, शिवसेनेचा काँग्रेसला मोलाचा सल्ला

News Desk