HW News Marathi
देश / विदेश

आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेबाहेर अध्याय देण्याचा पहिला मान स्वारातीम विद्यापीठाला

उत्तम बाबळे

नांदेड :- अमेरिकेतील अमेरिकन इन्स्टिटयूट ऑफ प्रोफेशनल ज्यूओलॉजिस्ट यांनी अमेरिकेच्या बाहेर प्रथमच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी अध्याय (चॅप्टर) ला मान्यता दिली आहे. विद्यापीठासाठी ही खूप कौतुकास्पद बाब आहे. जागतिक स्तरावर अमेरिकेबाहेरील हे पहिले विद्यापीठ आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी याबद्दल भूशास्त्र संकुलातील सर्व प्राध्यापकांचे कौतुक केले आणि अमेरिकन इन्स्टिटयूट ऑफ प्रोफेशनल ज्यूओलॉजिस्टचे आभार मानले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भूशास्त्र संकुलात शिक्षण घेणाऱ्या आणि ज्ञानार्जन करणाऱ्या सर्वांनाच या अध्ययनाचा फायदा होणार आहे. जगभरातील भूगर्भामध्ये होणारे बदल त्यावरील अभ्यास उपाययोजना इत्यादी सर्व बाबतीत जवळून अभ्यास करण्याची संधी संकुलातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. संस्थेची स्थापना १९६३मध्ये झालेली आहे. अगदी बारकाईने भूगर्भातील होणाऱ्या हालचाली, बदल आणि पर्यावरणातील होणारे बदल यासर्वच गोष्टीवर बारकाईने अभ्यास करण्यात येतो. आजपर्यंत या संस्थेचे अध्याय फक्त अमेरिकेपुरतेच मर्यादित होते. अमेरिकेबाहेर पहिल्यांदाच त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची निवड केली आहे. या अध्यायामुळे अमेरिकेतील अत्याधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाचा फायदा आपल्याकडील विद्यार्थ्यांना होणार आहे. शिवाय या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या नोकरीच्या संधीही आपल्याकडील विद्यार्थ्यांना मिळणार आहेत.

अमेरिकेतील संस्थेचे कार्यकारी संचालक ऑरोन जॉन्सन आणि संस्थेचे विश्वस्त जेम्स जॉकोब्स यांनी निवड झाल्याचे विद्यापीठास कळवून अभिनंदन केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आईचे दूध मिळत नसल्याने दरवर्षी अडीच लाख बालकांचा मृत्यू

News Desk

गुगलच्या डुडलद्वारे शिक्षकांना शुभेच्छा

News Desk

अवघ्या चौदा मिनिटांत अमेरिका नष्ट करणार, उत्तर कोरियाची धमकी

News Desk