HW News Marathi
देश / विदेश

आम्ही मोदी सरकारसमोर झुकणार नाही- ममताने पुन्हा खडसावले

कोलकाता ( वृत्तसंस्था)- आम्ही कोणाही समोर झुकणार नाही पश्चिम बंगालमध्ये तर हिंदू समाजाला भामट्या हिंदूंकडून त्रास सहन करावा लागतो, अशी खरमरीत टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. आम्ही सिंगूर कमिशनप्रमाणेच २१ जुलैला झालेल्या घटनेसाठीही कमिशन स्थापले आहे. आमच्या विरोधात भाजपने षडयंत्र आखल आहे, असा आरोप त्यांनी केला.

यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीकेचे ताशेरे झाडले आहेत. सध्याच्या घडीला राज्यातले आणि देशातले वातावरण हे आणीबाणीपेक्षाही वाईट आहे, सामान्य माणसांचे हक्क हिरावून घेतले जात आहेत. भाजप हा एक भ्रष्ट पक्ष आहे, ईडी किंवा सीबीआयचा उपयोग गुजरात किंवा उत्तर प्रदेशातल्या सरकारविरोधात केला जात नाही, फक्त टीएमसी किंवा राजदसारख्या पक्षांची बदनामी करण्यासाठी केला जातो असंही ममता बॅनर्जी यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सामान्यांना ऐन दिवाळीत वीज दरवाढीचा फटका

News Desk

तेजस ठाकरेंच्या संशोधनाची ‘आंतरराष्ट्रीय जर्नल’ने घेतली दखल

News Desk

पंतप्रधानांचे राष्ट्राला उद्देशून संबोधन !

News Desk