HW News Marathi
देश / विदेश

आयकर अधिकाऱ्याच्या घरातून साडेतीन कोटीची रोकड जप्त

वृत्तसंस्था-सीबीआयने बुधवारी झारखंडचे आयकर विभागाचे प्रधान आयुक्त तपस कुमार दत्ता यांच्या कोलकाता येथील घरी छापा टाकून कोट्यवधींचे घबाड ताब्यात घेतले. कोलकात तसचे रांची येथील 23 ठिकाणी छापे टाकून सीबीआयने सुमारे ३.५ कोटींची रोकड आणि ५ किलो सोने सीबीआयने जप्त केली आहे. आयकर विभागाचे प्रधान आयुक्त तपस कुमार दत्ता आणि इतर अधिकाऱ्यांविरोधात भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली गुन्हे दाखल झाल्यानंतर सीबीआयने ही कारवाई केली. कोलकातामध्ये १८ ठिकाणी आणि रांची येथे पाच ठिकाणी छापेमारी केली. छापेमारीत दत्ता यांच्या घरातून साडेतीन कोटींची रोकड आणि ५ किलो सोनं जप्त करण्यात आलं. या ५ किलो सोन्याची किंमत बाजारभावानुसार अंदाजे दीड कोटींच्या आसपास आहे. तसंच अनेक महत्त्वाची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रचला इतिहास ! निर्मला सीतारामन देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री

News Desk

बारावीचा पेपर देताना विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

News Desk

शरद पवारांचे केरळमध्ये काँग्रेसला ‘खिंडार’, केरळची महिला नेता राष्ट्रवादीत करणार प्रवेश

News Desk