HW News Marathi
देश / विदेश

इंधनाप्रमाणे आता सिलिंडरचे दरही प्रत्येक महिन्याला बदलणार

नवी दिल्ली( वृत्तसंस्था): अच्छे दिन दाखवण्याच्या प्रयत्नात केंद्र सरकार दररोज नवनवे निर्णय घेऊन ग्राहकांना धक्के देत आहे. काही दिवसांपूर्वी सरकारने इंधनाचे दर प्रत्येक महिन्याला बदलतील असे सांगितले होते. आता सरकारने अनुदानित सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्याचे आदेश सरकारी तेल कंपन्यांना दिले आहेत. त्यामुळे अनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किमतीत दर महिन्याला ४ रुपयांची वाढ होणार आहे. पेट्रोलमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.

याआधी केंद्र सरकारने तेल कंपन्यांना अनुदानित सिलिंडरच्या किमतीत महिन्याकाठी २ रुपयांची वाढ करण्याच्या सूचना केल्या होत्या. आता घरगुती वापराच्या अनुदानित सिलिंडरच्या किमतींमध्ये दुपटीने वाढ करण्यात येणार असल्याची माहिती पेट्रोलीयम मंत्र्यांनीलोकसभेत बोलताना दिली. दर महिन्याला अनुदानित सिलिंडरच्या किमतीत ४ रुपयांची वाढ करुन अनुदान संपुष्टात आणले जाईल, असे त्यांना सांगितले. सध्या प्रत्येक कुटुंबाला वषार्काठी १२ सिलिंडर अनुदानित दरांमध्ये मिळतात. यानंतरचे सिलिंडर ग्राहकांना बाजार भावानुसार खरेदी करावे लागतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रामायण पठण कार्यक्रमात दलितांना घराबाहेर न पडण्याचे फर्मान

News Desk

राम भक्तांसाठी मोदी सरकार बनवणार मुव्हिंग ब्रीज, पहा व्हिडीओ

News Desk

संजय राऊत राष्ट्रपती झाले तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट चालेल !

News Desk