HW News Marathi
देश / विदेश

इसिसच्या दहशतवाद्यांकडून सुन्नी अरबी महिलांवर बलात्कार

चिमुरड्यांसमोरच होतो बलात्कार

बगदाद – इसिसचे दहशतवादी केवळ दहशतवाद माजवत नाहीत तर ते महिलांवर अतोनात अत्याचार करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

यहुदी महिलांना वाईट वागणूक देणारे इसिसचे दहशतवादी सुन्नी अरबी महिलांचा बलात्कार करण्याबरोबरच त्यांना टॉर्चरही करतात. ह्यूमन राइट्स वॉचने हे मत मांडलेले आहे. वाचडॉगसमोर इस्लामिक स्टेटद्वारे हवाजामध्ये सुन्नी अरबी महिलांना बळजबरीने ताब्यात ठेवणे, मारहाण करणे, बळजबरीने विवाह, रेप अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. हवाजावर अजूनही इसिसचे नियंत्रण आहे. तो इराकच्या किरकूक प्रांतातील एक जिल्हा आहे.

हवाजामध्ये गव्हर्नमेंट फोर्सेस आणि इस्लामिक स्टेटच्या जिहादींमध्ये अनेक महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. HRW ने 26 वर्षांच्या हनानच्या कहाणीचे उदाहरण देत सांगितले की, तिचा नवरा अचानक हवाजामधून गायब झाला होता. हनानसह इतर महिला जेव्हा शहरातून पळून जाण्याचा प्रयत्न करत होत्या, त्यावेळी IS च्या दहशतवाद्यांनी त्यांना ताब्यात घेतले होते. IS च्या दहशतवाद्यांनी हनानला सांगितले की, तिचा पती पळून गेल्याने ती पतित झाली असून तिने आता एखाद्या स्थानिक जिहादीबरोबर निकाह करायला हवा. हवाजामधून पळून जाणाऱ्या इराकी कुटुंबांना शहरापासून 25 km अंतरावर हलवण्यात आले आहे.

चिमुरड्यांसमोर रोज बलात्कार

हनानने जेव्हा या प्रस्तावाला नकार दिला तेव्हा तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधून प्लास्टीकच्या केबल्सने तिला मारहाण करण्यात आली. हनानचे हात मागे बांधण्यात आले आणि तिच्यावर बलात्कार करण्यात आला. हनानने HRW ला सांगितले की, एकाच व्यक्तीने रोज तिच्यावर बलात्कार केला. एका महिन्यांनी तिच्या डोळ्यांवरील पट्टी खोलण्यात आली. त्यानंतर तिच्या मुलांसमोरही तिच्यावर बलात्कार करण्यात आला.

वाचडॉगच्या मते, या मुद्द्याकडे लक्ष वेधण्यात आलेलेच नाही. ज्याप्रकारे हा मुद्दा हाताळण्यात आला, त्यावरही कलंक लागला. त्यामुळे अशा प्रकारची प्रकरणेही मोठ्या प्रमाणावर समोर येत नाहीत. HRW च्या डेप्युटी मिडल ईस्ट डायरेक्टर लामा फॅकियाह म्हणाल्या, ISIS च्या काळात सुन्नी अरबी महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांबाबत फार कमी लोकांना माहिती आहे. या सर्व पीडितांना पाठिंबा देण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय कम्युनिटी आणि लोकल अथॉरिटीज यांच्यासाठी जे काही करू शकतात ते करण्याचा प्रयत्न करतात.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नेपाळ लिपुलेख, कालापानी हा नेपाळचाच भाग असल्याचा नकाशा प्रकाशित करणार

News Desk

HW न्यूज नेटवर्कच्या दोन्ही महिला पत्रकारांना जामीन मंजूर

News Desk

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे वयाच्या ९४व्या वर्षी निधन

News Desk