HW News Marathi
देश / विदेश

उत्तर प्रदेशात१३ वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करून केली हत्या

उत्तर प्रदेश | महिलांवर किंवा अगदी लहान मुलींवर अत्याचार, बलात्कार अशा गुन्हेगारीच्या घटनामुळे चर्चेत असलेल्या उत्तर प्रदेशात शरीराचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका १३ वर्षीय दलित मुलीवर काही नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर अल्पवयीन मुलीच्या डोळ्यांसह शरीराचे इतर भाग कापल्याची भयंकर घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीतील ईसापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी २ नराधमांन ताब्यात घेतले आहे.

लखीमपूर खेरीतील ईसापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पकरिया गावात ही मुलगी आणि तिचे कुटुंब राहते. मुलगी शौचासाठी घराबाहेर पडली होती. त्यानंतर ती घरी परतलीच नाही. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवली होती. त्यानंतर ऊसाच्या एका शेतात मुलीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला होता. शवविच्छेदन अहवालात मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून, यात ऊसाच्या शेताचा मालक असलेल्याचाही समावेश आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

टोल नाक्यांवर न्यायाधीश आणि व्हीआयपींना स्वतंत्र लेन | मद्रास उच्च न्यायालय

News Desk

तब्बल १२ दिवसांनंतर जम्मू-काश्मीरमधील फोन-इंटरनेट सेवा सुरू

News Desk

१०% सवर्ण आरक्षण जम्मू-काश्मीरमध्येही लागू, केंद्राचा महत्त्वपूर्ण निर्णय

News Desk