HW News Marathi
देश / विदेश

काँग्रेसचा हात सपाची सायकल चालवू  शकणार नाही 

उत्तर प्रदेश मध्ये काँग्रेस चा हात समाजवादी पक्षाची सायकल चालवू शकणार नाही अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी काँग्रेस सपा युती ची खिल्ली उडविली आहे . उत्तर प्रदेश च्या विधानसभा निवडणुकांत रिपाइं चे 47 उमेदवार निवडणुक लढत आहेत. गोरखपूर आणि देवरीया या जिल्ह्यांत नामदार रामदास आठवले यांनी आज रिपाइंच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ दौरा केला . गोरखपूर येथे झालेल्या सभेत आठवलेंनी सपा काँग्रेस युती वर टीकेची झोड उठविली .

उत्तर प्रदेशात काँग्रेस समाजवादी पक्षाच्या युतीला येथील दलित बहुजन अल्पसंख्य समाज पराभवाची धूळ चारेल . उत्तर प्रदेशातील सामान्य जनतेच्या प्रगतीसाठी दलितांना संरक्षण महिलांना संरक्षण देण्यासाठी गुंडाराज संपविण्यासाठी भाजप आणि आरपीआय शिवाय पर्याय नाही . काँग्रेस समाजवादी पार्टी ला येथे बहुमत मिळणार नाही बसपालाही बहुमत मिळणार नाही भाजप लाच उत्तर प्रदेशात बहुमत मिळेल तसेच यंदाच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात आरपीआय खाते उघडेल असा विश्वास ना रामदास आठवले यांनी व्यक्त केला उत्तर प्रदेशात बसपाला दलितांची सर्व मते मिळतील असे नाही तर आरपीआय लासुद्धा मिळतील . उत्तर प्रदेशात रिपब्लिकन पक्षाला गतवैभव प्राप्त करून देऊ असा निर्धार ना रामदास आठवले यांनी केला देवरिया येथे डॉ सरोज पांडे रिपाइंच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढत आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जम्मू काश्मीरमध्ये हिंसा केल्यास पाच वर्षांची शिक्षा

News Desk

संभाजीराजेंवर पाळत ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ! गृहमंत्र्यांनी तातडीने दिले ‘हे’ स्पष्टीकरण

News Desk

लस स्वतः कोरोना विषाणूचा संसर्ग रोखू शकत नाही – ट्रेडोस

News Desk