HW News Marathi
देश / विदेश

कैद्यांना भेटायला आलेल्या मुलींच्या चेहऱ्यावर मारले शिक्के

भोपाळ – कारागृहात असलेल्या आपल्या पालकांना आणि नातलगांना रक्षाबंधनाच्या दिवशी भेटण्याच्या आशाने आलेल्या मुलांना कारागृह प्रशासनाकडून संतापजनक वागणूक देण्यात आली. त्यांच्या हाताऐवजी चेहऱ्यावर शिक्के मारण्यात आले. मानवाधिकार आयोगाचे याप्रकरणी नोटीस बजावल्यानंतर मध्यप्रदेश शासनाला जाग आली असून त्यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. भोपाळ मध्यवर्ती कारागृहात मुलांच्या चेहऱ्यावर शिक्के मारण्यात आल्याचा प्रकरण अत्यंत गंभीर असून त्याच्या याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असे मध्यप्रदेशचे तुरुंग मंत्री कुसुम यांनी सांगितले. तसेच दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले.

दरम्यान, भोपाळचे तुरुंग अधिक्षक दिनेश नरगावे यांनी सांगितले की, रक्षाबंधनाच्या दिवशी तब्बल साडेआठ हजार लोक तुरुंगातील नातेवाईकांना भेटण्यासाठी येतात. त्यात काही महिला बुरखा घालून येतात. त्यामुळे चुकून शिक्का हाताऐवजी चेहऱ्यावर लागला असेल. हे जाणीवपूर्वक केलेले कृत्य नाही. गर्दीचा लाभ घेऊन कुणी कैदी पळून नये म्हणून ही खबरदारी घेतली जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले. तरीही जाणीवपूवर्क कुणे हे कृत्य केले असेल, तर त्याच्यावर कठोर करवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्नाटकमध्ये कुमारस्वामी सरकार पडले

News Desk

दीड लाख लोक मंगळवार जाणार

News Desk

HW न्यूज नेटवर्कच्या दोन्ही महिला पत्रकारांना जामीन मंजूर

News Desk