HW News Marathi
देश / विदेश

कुंबळे-कोहली वाद मिटला, कुंबळेंनी दिला राजीनामा

  • विराटला माझी प्रशिक्षण शैली आवडत नव्हती – कुंबळे

नवी दिल्ली – कर्णधार विराट कोहलीला माझ्या प्रशिक्षणाची शैली आवडत नाही, त्यामुळं भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा देत अनिल कुंबळे यांनी वादावर पडदा टाकलाय. त्यामुळं भारतीय संघाचा वेस्टंडिजचा दौरा हा मुख्य प्रशिक्षकांशिवायच होण्याची शक्यता आहे.

टीम इंडिया मंगळवारी विंडीज दौऱ्यासाठी रवाना झाली. त्या टीमसोबत अनिल कुंबळे गेलेच नाहीत. त्यामुळं कोहली-कुंबळे वादात आणखी तेल ओतलं गेलं. आयसीसीची वार्षिक परिषद सुरू असल्यामुळं क्रिकेट समितीच्या 22 जून रोजी होणाऱ्या बैठकीसाठी कुंबळे लंडनला राहिले, अशी सारवासारव भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. कुंबळे बैठकीनंतर विंडीजला रवाना होणार का? या प्रश्‍नाचे उत्तर मात्र त्यांनी टाळलं होतं.

कुंबळे यांचा प्रशिक्षकपदाचा करार चॅंपियन्स स्पर्धेपर्यंतच होता. त्यामुळं चॅम्पियन्स स्पर्धेला संघ रवाना होण्यापूर्वीच बीसीसीआयनं त्यांचा उत्तराधिकारी शोधण्यास सुरवात केली होती. कर्णधार कोहलीनंदेखील यात आघाडी घेतली. चॅम्पियन्स स्पर्धेदरम्यान प्रत्येक सामन्याच्या सरावा दरम्यान कुंबळे आणि कोहली यांच्यात अभावानेच संवाद होत होता. कुंबळे चर्चेऐवजी स्वतः नेटमध्ये गोलंदाजी करताना दिसत होते. चॅम्पियन्स स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी कोहलीने क्रिकेट सल्लागार समितीची भेट घेऊन त्यांच्यासमोर कुंबळे यांच्याबाबतची नाराजी स्पष्ट केली होती. त्यामुळेचं भारतीय संघ विंडीजला रवाना होत असलेल्या विमानात कुंबळे न दिसल्याने चर्चेला ऊत आला होता. भारतीय संघ 23 जूनपासून विंडीज संघाविरुद्ध पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. टीम इंडियाचा विंडीज दौरा कसा होतो, याविषयी क्रिकेटरसिकांमध्ये उत्सुकता निर्माण झालीय.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यंदाच्या अर्थसंकल्पातील ‘या’ वस्तू महाग आणि स्वस्त

swarit

हाफिज सईदला ही खरी अटक आहे की अटकेचे ‘नाटक’ !

News Desk

केजरीवालांनी महिलांच्या सुरक्षेसाठी मेट्रो आणि बसमध्ये प्रवास केला मोफत

News Desk