HW News Marathi
देश / विदेश

कमी गुण मिळाल्याने वर्गात विद्यार्थीनींचे कपडे काढले

हरिद्वार : गुरू – शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उत्तर प्रदेशातील हरिद्वार जिल्ह्यात घडली. इंग्रजीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने शिक्षिकेने दोन विद्यार्थिनींचे भरवर्गात कपडे काढल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. ही धक्कादायकशिक्षा करणाऱ्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरिद्वार जिल्ह्यातील लंढौरा येथील जे. पी. इंटरनॅशनल स्कूलमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी सहावीतील दोन विद्यार्थिनींच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सहावीतील दोन विद्यार्थिनींना इंग्रजीच्या चाचणीत कमी गुण मिळाले. त्यामुळे शिक्षिकेने त्या दोघींना भरवर्गात शर्ट काढण्याची शिक्षा केली, अशी माहिती पोलिस अधीक्षक मणिकांत मिश्रा यांनी दिली.

या प्रकारामुळे धक्का बसलेल्या मुलींना अखेर पालकांना हा प्रसंग सांगितल्यानंतर याला वाचा फुटली. त्यानंतर पालकांनी संबंधित शिक्षिकेवर कठोर कारवाई व्हावी यासाठी शाळेच्या व्यवस्थापनाला दोन दिवस धारेवर धरले. अखेर शाळेच्या व्यवस्थापनाने त्या शिक्षिकेला निलंबित केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात पहिल्या नंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच!

News Desk

पाकिस्तानकडून बेछूट गोळीबार, जवान शहीद

Gauri Tilekar

नीरव मोदी ब्रिटनमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांनी दिली माहिती

swarit