HW News Marathi
देश / विदेश

कुलभूषण जाधव प्रकरणी हस्तक्षेपास युनोचा नकार

न्यूयॉर्क – पाकिस्तानी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेमध्ये आपण कोणतीही मध्यस्थी करणार नसल्याचं संयुक्त राष्ट्र संघानं स्पष्ट केलं आहे. बुधवारी संयुक्त राष्ट्राच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या इशा-यानुसार संयुक्त राष्ट्र या प्रकरणापासून दोन हात लांब राहणार आहे. न्यूज एजन्सी आयएएनएसने दिलेल्या माहितीनुसार, संयुक्त राष्ट्राचे महासचिव अंतोनियो यांचे प्रवक्ता स्टिफन ड्यूजेरिक यांनी पत्रकारांशी बोलताना हे संकेत दिले आहेत.

स्टिफन ड्यूजेरिक यांनी सांगितलं की, संयुक्त राष्ट्र या प्रकरणात कोणत्याती प्रकारचा निर्णय देण्याचा स्थितीत नाही. ‘आम्ही सध्या कायदेशीर निर्णयावर टिप्पणी करण्याच्या परिस्थितीत नाही. यासंबंधी आम्ही काहीच बोलू शकत नाही’, असं स्टिफन ड्यूजेरिक बोलले आहेत. ‘जिथपर्यंत भारत – पाकिस्तान संबंधाचा प्रश्न आहे, तिथे आम्ही पहिल्यापासून सांगत आलो आहोत की दोन्ही पक्षांनी बसून शांतपणे चर्चा करत यामधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे’, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

कुलभूषण जाधव यांना सुनावण्यात आलेली शिक्षा तसंच भारत – पाकिस्तानमधील तणावपुर्ण संबधावर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देत असताना स्टिफन यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. हेरगिरी आणि विघातक कृत्ये केल्याचा आरोप ठेवून वर्षभरापूर्वी बलुचिस्तानमध्ये अटक केलेल्या कुलभूषण सुधीर जाधव यांना पाकिस्तानी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावल्याने भारतात संतापाची लाट उसळली आहे. भारताने पाकिस्तानचे सर्व आरोप फेटाळून लावत जर फाशी दिल तर ही पुर्वनियोजित हत्या समजली जाईल असं स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारसहित विरोधी पक्षांनाही पाकिस्तानच्या कायदेशीर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

कुलभूषण जाधव हे मुंबईच्या पवई भागात राहणारे असून, त्यांचा हेरगिरीशी काहीही संबंध नाही, असे भारताने तसेच कुलभूषण यांच्या कुटुंबीयांनी अनेकदा स्पष्ट केले आहे. या घटनेनंतर भारताने आपल्या ताब्यात असलेले १२ पाकिस्तानी कैदी न सोडण्याचा निर्णय घेतला.

कुलभूषण जाधव हे भारतीय नौदलाचे कमांडर दर्जाचे माजी अधिकारी होते. ते भारताच्या रीसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसिस विंग’ (रॉ) या गुप्तहेर संस्थेसाठी पाकिस्तानात हेरगिरी आणि विघातक कृत्यांची तयारी करत असताना पकडले गेले होते, असा पाकिस्तानचा दावा आहे. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, जाधव यांना गेल्या वर्षी ३ मार्च रोजी बलुचिस्तानात मश्केल येथे अटक केली होती. त्या वेळी त्यांच्याकडे सापडलेल्या पासपोर्टवर त्यांचे नाव हुसेन मुबारक पटेल असे दाखवले होते. त्यावर ते सांगलीचे रहिवासी असून, ठाणे कार्यालयाने त्यांना १२ मे २0१४ रोजी त्यांना पासपोर्ट दिल्याचा उल्लेखही आहे. पाकिस्तानने या आरोपाच्या समर्थनार्थ त्याच्या पासपोर्टची प्रतही प्रसिद्ध केली आहे.

पाकिस्तानच्या सुरक्षा दलांच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुख मेजर जनरल आसिफ गफूर यांनी सोमवारी एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, कुलभूषण जाधववर पाकिस्तानच्या लष्करी कायद्यानुसार कोर्ट मार्शल चालविण्यात आले आणि त्यात दोषी ठरल्यामुळे फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमाल जावेद बाजवा यांनी या शिक्षेवर सोमवारी शिक्कामोर्तब केले, असेही त्यात नमूद करण्यात आले.

जाधव यांनी दंडाधिकाऱ्यांपुढे आणि न्यायालयातही गुन्हे कबूल केल्याचा दावा करून या पत्रकात म्हटले की, बलुचिस्तान आणि कराचीमधील अशांतता काबूत आणण्यासाठी पाकिस्तान सरकारकडून केल्या जात असलेल्या प्रयत्नांमध्ये अडथळे आणून तेथे आणखी अस्थिर वातावरण निर्माण करण्यासाठी व हेरगिरी करण्यासाठी ‘रॉ’ने आपल्याला पाठविल्याचे जाधव यांनी शपथेवर कबूल केले. याआधी पाकिस्तान लष्कराने जाधव यांच्या या कथित कबुलीजबाबाचा व्हिडिओही जारी केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारसाहेब सरकारला मार्गदर्शन करत असतील तर तुमच्या पोटात दुखायचे कारण काय ? राष्ट्रवादीचा भाजपला सवाल

Gauri Tilekar

पंतप्रधान मोदींनी दिली एकतेची शपथ, देशभरात रन फॉर युनिटीचे आयोजन

News Desk

मोठी बातमी! भगतसिंग कोश्यारी यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात

News Desk