HW News Marathi
देश / विदेश

काश्मिरी अतिरेक्यांना मिळतो दुबई, इंग्लंडमधूनही पैसा

नवी दिल्ली – काश्मीरमध्ये अतिरेकी कारवाया करण्यासाठी केवळ पाकिस्तान पैसा पुरवित असल्याचा आपला आजपर्यंत समज होता. मात्र पाकिस्तानबरोबरच दुबई, इंग्लंड येथूनही अतिरेक्याना पैसा पुरविण्यात येत असल्याचे सुरक्षा यंत्रणांच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे.

टेरर फंडिंगप्रकरणी काश्मीरमधील अनेक फुटीरतावादी नेत्यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) चौकशी केली जात आहे. त्यात एनआयएने गेल्या महिन्यात अटक केलेला फुटीरतावादी नेता शाहिद उल इस्लामकडे काश्मीरमधील १५० दहशतवाद्यांच्या नावाची यादी मिळाली आहे. शाहिद, मीरवाइज उमर फारूकचा अत्यंत जवळचा आहे. फुटीरतावादी नेत्यांना फक्त पाकिस्तानच नव्हे, तर दुबई आणि इंग्लंडमधूनही निधी मिळत असल्याचे शाहिदने चौकशीत सांगितल्याचे सूत्रांकडून कळते.

शाहिदने १९९० मध्ये पाक व्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) दहशतवादी प्रशिक्षण घेतले आहे. प्रशिक्षण घेऊन परतल्यानंतर त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. मात्र तुरूंगातून बाहेर आल्यानंतर तो हुरियतशी जोडला गेला. तपासणीमध्ये शाहिदकडे दोन छायाचित्रे आढळून आली.यातील एका छायाचित्रात तो हिजबुल मुजाहिदीनचा म्होरक्या सलाउद्दीन बरोबर, तर दुसऱ्या छायाचित्रात त्याच्या बाजूला एके ४७ रायफल घेऊन उभा असलेले काही लोक दिसत आहेत. पोलिसांच्या मते दुसऱ्या छायाचित्रातील हे लोक दहशतवादी असण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे दिल्लीतील एका न्यायालयाने टेरर फंडिंगप्रकरणी शुक्रवारी हुरियतचा नेता सय्यदअली शहा गिलानीच्या जावयासहित इतर चार लोकांच्या एनआयए कोठडीत १० दिवसांची वाढ केली आहे. या सर्वांना २४ जुलै रोजी अटक करण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवरायांचा अपमान झाला असता तर तिथल्या तिथेच राजीनामा दिला असता !

News Desk

पाकिस्तामध्ये भारतीय दूतावास कार्यालयातील दोन अधिकारी बेपत्ता

News Desk

बाबा राम रहिमच्या ‘त्या’ इशाऱ्यामुळेच हरियाणात हिंसाचार

News Desk