HW News Marathi
देश / विदेश

चीनकडून सरकारविरोधातील वेबसाईडस बंद

वृत्तसंस्था: चीनने यावर्षी एप्रिल ते जून दरम्यान ३९१८ बेकायदा वेबसाइट बंद केल्या आहेत. सरकारच्या अधिकृत माध्यमांनी हे वृत्त दिले आहे. सायबरस्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशा आॅफ चायनाकडून (सीएस) जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार ज्या वेबसाइटवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यामुळे देशाचे नुकसान होत होते. देशात हिंसा आणि अफवा पसरवण्याचे काम या वेबसाइट करत होत्या. सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने दिलेल्या वृत्तानुसार, या कालावधीत ३१६ प्रकरणे न्यायालयीन विभागाकडे पाठवण्यात आली आहेत. या वर्षी दुस-या तिमाहीत ८ लाख १० हजार बेकायदा सायबर अकाऊंट बंद करण्यात आल्याची माहिती सीएसीने दिली आहे. त्याचबरोबर कायद्याचे भंग केल्याप्रकरणी ४४३ वेबसाइटला समन्स पाठवण्यात आले आहे. तर १७२ वेबसाइटला इशारा देण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसच्या महाअधिवेशनला सुरुवात

News Desk

महाराष्ट्रातल्या तीन महिलांना ‘नारी शक्ती पुरस्कार’; राष्ट्रपतींच्या हस्ते होणार ८ मार्च रोजी सन्मानित

Aprna

चायनीज खाद्यपदार्थांची विक्री करणारी हॉटेल्स बंद करण्याची रामदास आठवलेंची मागणी

News Desk