HW News Marathi
देश / विदेश

बॉम्बस्फोटात 24 ठार, 42 जखमी

वृत्तसंस्था( काबूल) अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात सुमारे २४ जण ठार झाल्याचे वृत्त आहे. एका आत्मघातकी हल्लेखोराने कारमध्ये बॉम्बस्फोट घडवला. यामध्ये अनेक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येते. या बॉम्बस्फोटात ४२ लोक ठार झाले आहेत. स्फोटात ठार होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी स्फोट झालेले ठिकाणी आपल्या ताब्यात घेतले असून परिसराला सुरक्षा दलांनी वेढा घातला आहे. अफगाणिस्तानच्या अंतर्गत मंत्र्यांनी ठार होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होईल, अशी भीती व्यक्त केली आहे.

दरम्यान, गेल्या महिन्यात अफगाणिस्तानमधील हेल्मंड प्रांतात न्यू काबूल बँकेच्या शाखेजवळ कारद्वारे घडवण्यात आलेल्या बॉम्बस्फोटात २०हून अधिक जण ठार झाले होते. या घटनेत ५० हून अधिक जखमी झाले होते. त्यापूर्वी हेरात प्रांतात मशिदीबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटात सात जणांचा मृत्यू झाला होता. अफगाणिस्तानातील भारताचे राजदूत मनप्रीत वोहरा यांच्या निवासस्थानाजवळ रॉकेट कोसळले होते. गेल्या काही महिन्यांपासून अफगाणिस्तानमध्ये आत्मघातकी हल्ल्यांच्या संख्येत मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘सरकार फक्त लोकांना फुकट पगार देण्यासाठी आहे का?, गडकरींनी अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर  

News Desk

उत्तर प्रदेश पोलीस हत्याकांड, मुख्य आरोपी विकास दुबेला अटक

News Desk

महिला पत्रकारांना पाठवू नका, हिंदू संघटनांचे माध्यमांना पत्र

swarit