HW News Marathi
देश / विदेश

चीनला भिडण्यासाठी नौदलाची नवी पाणबुडी

नवी दिल्ली – चीनकडून सातत्याने करण्यात येत असलेल्या युद्ध वल्गनांच्या पार्श्वभूमीवर भारतानेही आपले सैनिक सामर्थ्य वाढविण्यात आघाडी घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून नौदलाच्या ताफ्यात येत्या महिन्यात आयएनएस कलवारी ही पाणबुडी दाखल करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही पाणबुडी शत्रुच्या रडारवर न दिसणारी आहे.

भारताकडे १३ पाणबुड्या होत्या. ज्यांची संख्या आता ७ पर्यंत कमी करण्यात आली आहे. यातील ब-याचशा पाणबुड्या २० वर्षांहून जुन्या आहेत. त्यामुळे पाणबुड्यांची संख्या वाढविण्याकडे भारताने लक्ष दिले आहे. आयएनएस कलवारी ही हिंद महासागरात भारताच्या समुद्र सीमेचे संरक्षण करणार आहे.

चीनजवळ सद्यस्थितीत ६० पाणबुड्या असून त्यातील बऱ्याच हिंद महासागरात गस्त घालीत असतात. चीन स्वतःच्या पाणबुड्यांच्या माध्यमातून भारताच्या समुद्र हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठीच त्यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशाला पाणबुड्या विकल्या आहेत. तसेच आण्विक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज पाणबुडी कराचीलाही पाठवली आहे. चीनजवळ आता आण्विक हल्ल्यासाठी तयार असलेल्या 5 पाणबुड्या असून,डिझेलवर चालणा-या 54 पाणबुड्या आहेत. पेंटॉगॉनच्या रिपोर्टनुसार 2020पर्यंत चीनकडे 78 पाणबुड्या असतील.

लष्करातील कुठल्याही एका दलाच्या बळावर युद्ध जिंकणे शक्य नाही. यासाठी तिन्ही दलांची एकत्रित कामगिरी आवश्यक असते. तिन्ही दलांच्या एकत्रित कामगिरीमुळेच हे शक्य आहे. प्रशांत महासागर ते अ‍ॅटलांटिक महासागरापर्यंत भारतील नौदलाचा दबदबा आहे, से नौदलप्रमुख अॅडमिरल सुनील लांबा म्हणाले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १३२ व्या दीक्षान्त समारंभानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भारतीय तंत्रज्ञान आणि स्वदेशी जहाजांच्या निर्मितीला नौदलाने सुरुवातीपासूनच प्राधान्य दिले आहे. आतापर्यंत २००जहाजांची निर्मिती करण्यात आली आहे. ४१ जहाजांचे काम सुरू आहे. यात पाणबुड्यांचाही समावेश आहे. देशी तंत्रज्ञानाला प्राधान्य देत मेक इन इंडियाच्या योजनेनुसार देशातील उद्योगांच्या सहकार्याने नव्या जहाजांच्या उभारणीसाठी प्रयत्न सुरू आहेत. विक्रांत 2च्या बांधणीचे काम सुरू आहे, असेही लांबा म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्र सरकारने घातली ‘टिक-टॉक’वर बंदी, सोशल मीडियावर मिमचा पाऊस

News Desk

पुलवामातील शहीदांचे स्मरण करण्याची ही पद्धत आहे का ?

News Desk

महाराष्ट्रातील ८७ विद्यार्थी युक्रेनमधून दिल्लीत दाखल; महाराष्ट्र सदनाद्वारे १२६ विद्यार्थी सुखरूप स्वगृही परतले

Aprna