HW News Marathi
देश / विदेश

दलित विद्यार्थ्याला लघवी प्यायला लावली

जैसलमेर – खासगी बस धुण्यास नकार दिल्याच्या कारणावरून गौतम नावाच्या १२ वर्षीय दलित विद्यार्थ्याला लघवी पिण्यासाठी खासगी बसच्या कर्मचाऱ्यांनी जबरदस्ती केल्याची घटना जैसलमेरच्या बारमेर जिल्ह्यातील बलोत्रा गावात उघडकीस आली. या कर्मचाऱ्यांची मुजोरी इथेच थांबली नाही तर त्यांनी गौतमला शिवीगाळ करत इलेक्ट्रिक शॉकही दिला. या घटनेमुळे शारीरिक आणि मानसिक धक्का बसलेल्या गौतमला नजीकच्या नहाता रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

गौतमने दिलेल्या माहितीनुसार, तो बलोत्रा बस स्थानकावर बसची वाट पाहत उभा असताना तिथे आलेल्या त्या खासगी बसच्या ड्रायव्हर आणि कंडक्टर यांच्यासह ४-५ कर्मचाऱ्यांनी त्याला बस धुण्यास सांगितले. जेव्हा गौतमने बस धुण्यास नकार दिला तेव्हा त्या कर्माचाऱ्यांनी त्याला लघवी पिण्यासाठी जबरदस्ती केली. तसेच गाडीच्या बॅटरीच्या सहाय्याने इलेक्ट्रिक शॉकही दिला आणि जातीवाचक शिवीगाळही त्याला करण्यात आली.

याप्रकरणी गौतमचे काका ओमराम यांनी पोलिसात तक्रार केल्यानंतर बसचा कर्मचारी जसवंत सिंग याला अटक करण्यात आली. फरार असलेल्या इतर ४ आरोपींचा तपास पोलिस करत आहेत. त्या खासगी बसलाही शोधण्याचे दिशानिर्देश पोलिसांना देण्यात आले असून ही घटना घडली त्यावेळी ती बस गुजरातच्या दिशेने निघाली असल्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक कैलाश दान रत्नू यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रामदास आठवले केरळ दौऱ्यावर

News Desk

वाहने रस्त्यावर सोडून एक दिवस लोकांना घरी जावे लागेल,मग बसा बोंबलत! – सामना

News Desk

HW Exclusive | भाजपची राज्य सरकारवर टीका, अमित देशमुखांनी दिला ‘हा’ सल्ला !

News Desk