HW News Marathi
देश / विदेश

दहशतवाद्याचे चिथावणीखोर भाषणाचे 25 तास प्रसारण

लंडनः मुस्लिम कम्युनिटी रेडिओ स्टेशनने तब्बल 25 तास अलकायदा या दहशतवादी संघटनेचे भाषण प्रसारित लंडनमध्ये प्रसिद्ध केल्याने खळबळ उडाली आहे. अमेरिकेवर 9-11 रोजी हल्ला करणारा दहशतवादी अनवर अल-औलाकीने याचे चिथावणीखोर भाषणाचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान,संबंधित रेडिओ स्टेशन विरोधात ब्रिटनचे संचार विभाग ऑफकॉम (ऑफिस ऑफ कम्युनिकेशन्स) येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

इमाम FM च्या मालकांनी कुख्यात दहशतवादी अनवर अल-औलाकीचे व्हिडिओ युट्यूबवर पाहिले होते. एखाद्या धार्मिक नेत्यासारखा दिसणारा हा दहशतवादी धार्मिक गोष्टींवर बोलत असल्याचा त्यांना भास झाला. यानंतर त्यांनी सर्व 25 तासांचे व्हिडिओ डाऊनलोड केले. हेच व्हिडिओ रमजानमध्ये इमाम FM ने धार्मिक कार्यक्रम म्हणून प्रसारित केले. दरम्यान, या रेडिओ स्टेशनला सरकारने नोटीस बजावली असून 21 दिवसांच्या आत योग्य उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाबा आमटे यांच्या जयंतीनिमित्ताने गुगलकडून अभिवादन

News Desk

Live Update | भारताच्या ७० व्या प्रजासत्ताक दिनासाठी राजपथ सज्ज

News Desk

‘वंदे भारत एक्‍स्प्रेस’ १५ फेब्रुवारीला धावणार

News Desk